नवापूर। नवापुरात घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. बस स्टँण्ड परिसर ते कॉलेज रोड परिसरात शहरातील नागरिक मोठया प्रमाणात सायंकाळी साईमंदिर काँलेजरोड परिसरात फिरायला जातात माञ डासांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील डासांचा प्रार्दुभाव रोखण्याकरीता नगरपालिका प्रशासन कुचकामी उपाययोजना करीत असल्याची तक्रार शिवसेनेने केली आहे. याबाबत नगराध्यक्ष रेणुका गावीत यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की नवापूर शहरातील स्वच्छतेचा पूर्णता बोजवारा उडाला असून विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. तत्काळ उपाययोजन न केल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
निवेदनावर उपजिल्हा प्रमुख हंसमुख पाटील, तालुका प्रमुख गणेश वडणेने, शहर प्रमुख गोविंद मोरे, युवासेना शहर प्रमुख राहुल टिभे, दर्पन पाटील, प्रविण ब्रम्हे, अनिल वारुळे, राकेश धोडीया, दिनेश भोई, मयुर पाटील, जयेश मोरे, आशिष मावची, सतीश राणा, भटु पाटील, अविनाश पिसे, रुपेश जगदाळे, सचिन कासार, गोवी सेन यांचे हस्ताक्षर आहे.
शहरात आजपासूनच औषध फवारणी करण्यात येणार असुन शहरातील काही मोकळ्या जागेवर काटेरी झुडपे वाढली आहेत ती पण काढण्यात येणार आहेत. ज्या भागात घाण आहे अस्वच्छता आहे, त्याकडे गंभीरपणे लक्ष देऊन कारवाई केली जाईल. ज्या कंपनीला स्वच्छता बाबत ठेका दिला आहे त्यांना त्वरीत सुचना देण्यात आल्या आहेत.
रेणुका गावीत
नगराध्यक्षा, नवापूर नगरपालिका