नवापूर । नवापुर शहरात कावड यात्रा समितीतर्फे कावड यात्रा गोमुख येथे काढण्यात आली होती. ही यात्रा गणपती मंदीरापासुन काढण्यात आली. या कावड यात्रेचा शुभारंभ तथा स्वागत माजी नगराध्यक्ष दामु बिराडे,उद्योगपती रमेश अग्रवाल,नगरसेवक अजय पाटील, शिवसेना उपजिल्हाप्रमुख हंसमुख पाटील,सामाजीक कार्यकर्ता विजय सेन,हेमंत जाधव,रज्जु अग्रवाल,मयुर सिंधी,संदिप चौधरी, अतुल तांबोळी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
तीन वर्षाची परंपरा
कावड यात्रा गणपती मंदीर,लाईट बाजार,महात्मा गांधी पुतळा,शितल सोसायटी,कुंभारवाडा,करंजी ओवारा,या मार्गाने गोमुखकडे रवाना झाली. दरवर्षी श्रावण मासनिमित्त गोमुख येथे ही कावड यात्रा जात असते. गोमुख येथे प्राचीन महादेवाचे मंदीर आहे. कावडमध्ये रंगावली नदीचे पाणी घेऊन गोमुख येथे महादेवचा पिंडावर अभीषेक करण्यात आला. यानंतर नवापुर तालुक्यात सुखशांती राहावी आरोग्य लाभावे व पाऊस भरपुर प्रमाणात पडावा यासाठी प्रार्थना करण्यात आली. कावड यात्रेचे नियोजन कावड यात्रा समितीचे प्रमुख दर्शन पाटील,जितेंद्र अहिरे,रामकृष्ण गिरासे,राहुल मराठे,विशाल पाटील,रुषकेश पाटील,भुषण पाटील,महेंद्र नेरकर,प्रकाश नाईका,रमेश गावीत,सागर ठाकरे, सतिष पाटील यांनी केले होते. 3 वर्षापासुन कावडयात्रा जात असुन हरहर महादेव चा गजरात कावडयात्रेने रस्ते भरले होते.