नवापूरचा भाजीपाला बाजार कृषी उत्पन्न समितीच्या जागेत भरणार

0

नवापूर : शहरात स्वामी विवेकानंद चौक मधील रहीवाशी आणि जि.प सदस्य भरत गावीत यांनी कोरोना चा पार्श्र्वभूमीवर शहरातील डॉ बाबासाहेब रोडवरील मध्यवर्ती ठिकाणी भरत असलेला भाजीपाला बाजार तात्पूरत्या स्वरुपात मोकळ्या मैदानात भरविण्या विषय चे निवेदन तहसीलदार यांना दिले होते. सध्या ज्या ठिकाणी भाजी पाला विक्रेते आपला व्यवसाय करीत आहेत तेथे रहिवाशी क्षेत्र असून बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारी म्हणून सदर बाजार हा मोकळ्या जागेवर स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी तथा सूचना करण्यात ईली होती. दैनिक जनशक्तीने कमी जागेत भरलेल्या मोठा भाजीपाला बाजार रहिवाशांचा आरोग्याशी खेळ खेळत असुन बाजार मोकळ्या जागेत भरविण्याची मागणी करुन आँनलाईन न्युज देताच त्याची दखल प्रशासनाने घेऊन त्या अनुशंघाने तहसीलदार सूनीता जऱ्हाड यांनी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानाची पहाणी करून भाजी पाला व्यवसायीकाचा व नागरीकांचा आरोग्याचा दृष्टीने ही जागा योग्य असल्याचे सांगितले. त्या प्रमाणे त्यांनी नगर पालिका कार्यालयीन व्यवस्थापक अनिल सोनार व नगरसेवकांशी चर्चा केली बाजार समितीच्या दोघ शेड मध्ये व्यवसायीकांची व्यवस्था होऊ शकते.या आवारात यापुढे भाजीपाला बाजार भरणार आहे. यावेळी सोशल डिस्टनची कडक अमंलबजावणी होणे आवश्यक आहे.त्याकडे व्यापारी व नागरीक, प्रशासनाने पालन करावे अशी अपेक्षा आहे.