नवापूरची वाहतूक समस्या बनली गंभीर

0

नवापूर (हेमंत पाटील)। नवापूर शहराची ट्राफिक समस्या गंभीर बनली असून यावर कोणाचेच नियंत्रण राहिले नसल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था पुर्णता कोलमडली आहे, अगदी बेशिस्त झाली आहे, नगरपालिका समोरील रस्ता, मेनरोड, लाईट बाजार, मच्छी बाजार, नारायण पुर रोड, शास्त्री नगर, बसस्थानक मार्ग आदी भागात रोजच ट्राफिक जाम होऊन वाहन चालकांमध्ये ‘हमरी-तुमरी‘ होऊन भांडण होण्याचे प्रकार वाढले आहेत, तासनतास वाहतूकीचा खोळंबा होऊन वाहने ठप्प होतात. जड वाहनांच्या शहरात प्रवेश, वाहनांची वाढती संख्या यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था बेशस्त होऊन गंभीर बनली आहे. पोलीस व नगर पालिकेने यावर अद्याप यावर कोणतीही उपाययोजना केलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकांची मानसिकता बदलायला तयार नाही. शहरात कुठे ही वाहने लावून नियमांची पायमल्ली करत असतांना दिसून येत आहे.

मुख्य रस्त्यांवर पार्किंगची व्यवस्था नसल्याने वाहनधारकांचा संताप
शहरातील लिमडावाडी, शितल सोसायटी, नारायण पुर, सराफ गल्ली, शिवाजी रोड आदी भागात प्रवासी वाहतूक वाहने मोठ्या प्रमाणावर उभे राहतात त्यामुळे लोकांना पुढे निघतांना फारच ञास सहन करावा लागत आहे प्रवासी वाहने उभी करण्यासाठी कोणती ही उपाय योजना नसल्याने प्रवासी वाहने कुठे ही उभी केली जात असल्याचे चिञ दिसते या वाढत्या प्रवासी वाहनांन मुळे शहरातील गल्ल्या लहान होऊन अडचणीचा झाल्या आहेत काही बोलल तर रहिवासी व चालकात भांडणे होण्याची भीती वाटत असल्याने सर्व चिडीचुप होऊन अलबेल चालले आहे जड वाहने बसेस शहरातुन जात असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण या मार्गावर प्राथमिक, माध्यमिक, कॉलेज, बालमंदिरे आहेत लहान मुले मोठ्या संख्येने याच मार्गावरून जाण्यायेण्याची वर्दळ दिसून येते. तसेच हा मार्ग शहरातील मुख्य मार्ग असल्याने भागात मोठी बाजारपेठ, मंदिरे, मशिद, दुकाने असल्यामुळे शहरात कूठे ही पार्कीग तसेच वाहन तळची व्यवस्था नाही. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेचे अक्षरशः बारा वाजले जातात.

उपाय योजनेची मागणी
शहरातील गंभीर बनत चालली वाहतूक समस्ये बाबत तहसीलदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी, पोलीस निरीक्षक यांनी एकत्र बैठक घेवून नागरीकांशी चर्चा करावी. यावर काय उपाय योजना करता येईल यांचा विचार करून योग्य नियोजन केल्यास वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. यासाठी नागरिकांची मानसिकता बदलण्यासाठी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सेवा भावी संस्था तसेच लोकसहभाग घेतला तर सकारात्मक प्रतिसाद मिळु शकेल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे

बॅरीकेट तोडले जाते की धक्का लागतो?
नगरपालिकेने शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी केली होती दोन वेळा लोखंडी बॅरीकेटस मेनरोडला लावून जड वाहने बंद झाली होती. त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली होती. मात्र लोखंडी बेरीकेटला जड वाहने धक्का देऊन ते तोडून टाकण्याचे प्रकार घडले. नगरपालिका बेरीकेट लावायचे व जड वाहने ते वारंवार तोडून टाकण्याचा प्रकाराने अखेर बेरीकेट पुन्हा लावणे बंद झाले आणि पुन्हा एस.टी.बसेस व जड वाहने शहरात प्रवेश करू लागली व पुन्हा वाहतुक समस्या निर्माण झाली

वाहतूकीच्या कोंडीमुळे चालकांमध्ये वाद
वाहतूकीचे एवढी गंभीर समस्या बनल्यानंतर ही याकडे कोणाची गंभीरपणे विचार किंवा दखल घेतली नसल्याने शहरवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत कोणाची मानसिकता राहीलेली नाही का? असा प्रश्न उपस्थित केला जात. जिल्हाधिकारी साहेबांनी नवापूरची वाहतूक समस्यांकउे लक्ष देऊन यावर उपाय योजना करावी, अशी मागणी केली जात आहे

उपाय योजना याप्रमाणे करता येईल
शहरातील वाहतूक समस्या सुटुन शिस्त लागावी यासाठी लाईट बाजार, मेन रोड रस्त्यावर पार्किंग व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंग , तसेच याज भागात वाहन तळ करायला पाहिजे वाहन तळ ठिकाणी शुल्क आकारले जाऊन तेथे एक व दोन जणांची नेमणूक करावी, डिजिटल फलक, वाहतूक नियम तयार करून दंडात्मक कारवाई करावी या भागात कायम स्वरूपी दोन या तीन वाहतूक पोलीस नेमावे हे करणे शक्य आहे तसेच शहरात शासकीय जागा शोधून प्रवासी वाहने उभे करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.