नवापूरला एरिया ख्रिस्ती मंडळाचा स्थानिक प्रशासनाला मदतीचा हात

0

नवापूर । तालुक्यातील एरिया ख्रिस्ती मंडळांनी स्थानिक प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे. तालुक्यात ‘इंडियन नॅशनल फुल गोसाल चर्च फेडरेशन ऑफ भारत’ या संस्थेशी संलग्नीत 35 ते 40 मंडळ कार्यरत आहे. जगभरात धुमाकुळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संस्थेचे बिशप बेनहर के. राज व संस्थेचे जनरल सेक्रेटरी आर.एम.पटेल यांनी येथील मंडळांना व मंडळाच्या पदाधिकार्‍यांना निधी गोळा करण्याचे आव्हान केले होते. त्याअनुषंगाने येथील तालुकास्तरीय एरिया संगती सभेचे प्रमुख पास्टर पोसल्या जे.गावित व ट्रस्ट बोर्ड सदस्य रेव्ह.हुराजी डी.गावित यांनी इतर पास्टर व सल्लागार समितीच्या मदतीने मदतनिधी गोळा करण्याचा प्रयत्न केला असता काही सेवाभावी व्यक्तींनी मदतीचा हात पुढे केला आहे. याकामी 37 हजार 530 रुपयांच्या मदत निधी गोळा झाला आहे. या उपक्रमात नवापूर तालुक्यातील आंबाफळी, धुळीपाडा, बंधारपाडा, आम्रपाडा, देवलीपाडा येथील ख्रिस्ती मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

यात प्रामुख्याने मंत्रालयाचे सेवानिवृत्त सचिव सदानंद गावित रायगंण, प्रभाकर गावित युनियन बँक नवापूर, प्रवीण ठिंगळे, रायंगण यांनी आपले वैयक्तिक योगदान नोंदविले. याकामी 37 हजार 530 रुपयांच्या मदत निधी गोळा झाला. हा निधी आरोग्य विभाग व पोलीस विभाग यांना कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींची तपासणी करण्याकरिता आवश्यक असणार्‍या आधुनिक उपकरण इन्फारडे थर्मल स्कॅनर खरेदी करून स्थानिक प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले. यात पोलीस ठाण्याला एक, आरोग्य विभागाला एक देण्यात आले. आरोग्य विभागाला 5 आँक्सीपन्स मीटर  देण्यात आले. यावेळी पं.स सभापती रतिलाल कोकणी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, सहायक पोलीस निरीक्षक डिंगबर शिंपी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हरीचंद्र कोकणी आदी उपस्थित होते.
संस्थेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना नवापूर तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित, करंजी खुर्देचे माजी सदस्य जालमसिंग गावित, नवापूर मार्केट कमेटीचे संचालक नवलसिंग गावित यांचे मार्गदर्शन लाभले. मदतनिधी गोळा करण्यासाठी बोरपाडयाचे प्रा.जयराम गावित, करंजीचे  पोलीस पाटील शंकर मावची, पाथरबाराचे काशीराम गावित, बंधारपाडयाचे दिलीप सर यांनी परिश्रम घेतले.