नवापूर – येथील उपजिल्हा रुग्णालयात आयुष निदान व चिकित्सा शिबीराचे आयोजन वैद्यकिय अधिक्षक डॉ. किर्तीलता वसावे यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. शिबीरासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथुन आयुषतज्ञ डॉ. नितीन वळवी,युनानी तज्ञ डॉ. सैय्यद,होमियोपँथी तज्ञ डॉ. दुर्गेश शाह,तसेच नवापूरचे आयुषतज्ञ डॉ.प्रमोद कटारिया यांनी रुग्णांची मोफत तपासणी करुन मोफत उपचार केले.डॉ. किर्तीलता वसावे यांनी उपस्थित रुग्ण व नागरीकांना मोफत अयुवैद शिबीराचा लाभ घेण्यासाठी आवाहन केले. डॉ. नितिन वळवी यांनी आयुर्वेद युनानी व होमियोपँथी उपचारा विषयी माहिती दिली.
डॉ.प्रमोद कटाकिया यांनी आयुवैदाचे महत्व सांगताना स्पष्ट केले की आपण आपल्या दिनचर्यचे नियोजन केले पाहिजे.दीनचर्या ही आपली ऋतुनुसार असावी. सकाळी लवकर उठुन व्यायाम योगा केला पाहिजे.अभंगस्नान करुन प्रातविधी आटोपुन आहार चांगला घ्यावा.बाहेरचे जेवण टाळावे. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आपण आयुर्वेदाचा अंगिकार केला पाहीजे तरच आपण आपले आयुष्य निरोगीपणे जगु शकतो. सदर कार्यक्रमाला बालरोग तज्ञ डॉ. युवराज पराडके, डॉ. धिरेंद्र चव्हाण, डॉ.राज भुसावरे, डॉ. चेतना चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन समउपदेशक कैलास माळी यांनी केले.