नवापूर (हेमंत पाटील) । जस जशी मतदानाची तारीख जवळ येत आहे, तस तसा नवापूर नगर पालिका निवडणुकीची रणधुमाळीचा जोर अधिकच वाढत आहे. सध्या बंडखोरी केलेले उमेदवार, एकमेकांविरोधात लढत असलेले नातेवाईक या दोन मुद्दयांमुळे निवडणुकीत वेगळीच उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेक वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून कामे केली.. सहकार्य केले पण तरीही उमेदवारी देताना डावलण्यात आले ही खंत मनात ठेवून अनेकांनी आपला वेगळा मार्ग निवडला आहे आहे.
अनेकांना करावी लागणार तारेवरची कसरत
भाजपचे विशाल सांगळे यांनी बंडखोरी करुन प्रभाग 2 मध्ये उमेदवारी करत आहे तर काँग्रेसचे माजी ग्रा प सदस्य व नगरसेवक म्हणुन सातत्याने निवडुन येणारे जुने जाणते जेष्ठ नगरसेवक रमला राणा यांनी ही तिकिट मिळाले नाही म्हणुन बंडखोरी करुन प्रभाग 5 मधुन राष्ट्रवादी कडुन उमेदवारी करत आहे तर काँग्रस समर्थक सुधीर निकम,आंबादास आतारकर यांनी ही बंडघोरी करुन अपक्ष उमेदवारी करत आहे. आम्हा निष्ठावंतांना उमेदवारी दिली नाही.आम्ही अनेक वर्ष पक्षाशी निष्ठा ठेवुन कामे केली ,सहकार्य केले, निष्ठावंताची कदर नाही असा ते आरोप करत आहे तर पक्षाने यांना मोठे केले लाभ दिला यांनी उमेदवारी साठी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप होत आहे पक्षाला यांची उमेदवारी तारक की मारक ठरते. मतांची विभागणी होऊन पक्षाचा उमेदवारांला घातक ठरणार असा ही कयास व्यक्त केला जात आहे. संबध दोघी कडे चांगले राहण्यासाठी तारेवरची कसरत मतदार करत आहे. या निवडणुकीत पत्रकार हेमंत जाधव यांचा पत्नी मेघा जाधव तसेच पत्रकार सुधीर निकम हे स्वता तर सुभाष कुंभार यांचा पत्नी तसेच विकास आघाडी कडुन पत्रकार मंगेश येवले उमेदवारी करत आहे यात पत्रकार यशस्वी होतात की नाही त्यांना जनसेवेची संधी मिळणार का.? हे निकालानंतर समजेल.
अनेक मातब्बर निवडणूक रिंगणात
राजपुत समाजाचे नगराध्यक्ष पदासाठी हेमलता अजय पाटील व विकास आघाडी कडुन सोनल धर्मेद्र पाटील या उमेदवारी करत आहे राजपुत समाज यावेळी चमकला असुन एकाच समाजाचे एकमेकांसमोर लढत देत आहे तर नगरसेवक पदासाठी प्रभाग 7 मधुन आमने सामने काँग्रेस कडुन दर्शन प्रताप पाटील,,सीमा मदन पाटील, भाजप शिवसेनेतर्फे दर्शन दिपक पाटील,अरुणा हसमुख पाटील,वनीता तुळशीदास पाटील,राष्ट्रवादी कडुन विमला बाबुलाल पाटील उमेदवारी करत असुन या लढती कडे लक्ष लागुन आहे.
नाराजाची संख्या अधिक
उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजांची संख्या अधिक आहे. यात प्रमुख पक्षाचे अनेक जाणत्या जाणकारांचा समावेश आहे. त्यामुळे बंडखोरीमुळे ही निवडणूक अधिक गाजतांना दिसतेय.. पक्षाच्या लेबरवर लढणारे व बंडखोरीकरून अपक्ष किंवा दुसर्या पक्षाकडून लढणारे यांच्यातील लढत सर्वात उत्सुकतेचा विषय झाला आहे. या निवडणुकीतील दुसरी विशेष बाब म्हणजे अनेक प्रभागात नातेवाईक, मित्र नाते गोत्यातील मुलं समोरा समोर उभे असून समाजातील अनेक जण अभिमन्युचा चक्रव्युव्हात अडकल्याचे वाटत आहे, अशा परिस्थितीत ही निवडणूक अधिकच रोचक झाली असून मतदान व मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्रान शहरभर निवडणूकीचे बॅनर लागलेले आहेत.