नवापूर उपकोषागार कार्यालयात 29 लाखांचा अपहार

0

नवापूर । शहरातील उप कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदेलसिंग महारू जाधव (बंजारा) यांनी 11 जून रोजी उप कोषागार कार्यालयातील संगणक प्रणालीत तहसीलदार नवापूर यांचे खोटे देखक तयार करून त्यात खाडाखोड करून स्वतःचे नाव टाकून बँकेच्या सुचना पत्रकावर उप कोषागार अधिकारी नवापूर यांच्या खोट्या स्वाक्षरी करून बॅकेचे सुचना पत्रक भारतीय स्टेट बँका नवापूर यांच्या कडे सादर करून शासनाचा तिजोरीतून 29 लाख रूपये स्वताचा खात्यात जमा करून घेतले. सदर कनिष्ठ लिपिक असून नवापूर पोलिस शोध घेऊन अटक करण्यात आले आहे. उप कोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदेलसिंग महारू जाधव (बंजारा) यांच्या विरोधात अप्पर कोषागार अधिकारी प्रकाश बांधकर नवापूर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

कसा झाला प्रकार
त्याच्या खात्यात जमा झालेले एकूण 29 लाख त्यातून त्याने 11 जून रोजी एटीएम मधून 40 हजार रूपये काढले. त्यानंतर 12 जून रोजी बँकेच्या खिडकी वरून 25 लाख रूपये त्याच दिवशी एटीएम मधून 40 हजार काढले.25 लाख 80 हजार रूपये काढून घेतले उर्वरित रक्कम त्याच्या खात्यावर जमा आहेत.दोन दिवसानंतर बँकेच्या अहवाल आल्याने उप कोषागार संजय गोविंद साळी यांच्या लक्षात 29 लाखांचा अपहार झाल्याचे लक्षात आल्याने नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलिस हेड कनस्टेबल दिलीप चौरे, जितेंद्र तोरवणे, योगेश थोरात,शांतीलाल पाटील,महेश पवार आदि तपास करीत आहे