नवापूर डॉक्टर्स असोसिएशनतर्फे तहसिलदारांना निवेदन

0

नवापूर । डॉक्टरांवरील सतत सुरु असलेले हल्ले व शासनाची दबावाची भुमीका बाबत आज नवापुर डॉक्टर्स असोशिएशनतर्फे तहसीलदार प्रमोद वसावे यांना निवेदन देण्यात आले त्यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे की मागील एक आठवडयापासुन सतत रोज कुठेना कुठे डॉक्टर्स वर रुग्णाच्या नातेवाईकांकडुन व काही असामाजीक तत्वांकडुन हल्ले सुरुच आहोत ह्या हल्लयाच्या निषेधार्थ मुंबई, पुणे, कोल्हापुर, सोलापुर येथील रेसिडेन्ट डॉक्टर संपावर असताना त्यांना सेवेतुन कमी करणे त्यांचा सहा महीन्याचा पगार न देणे अशा पध्दतीची कार्यवाही शासना कडुन सुरु झालेली आहे.आम्ही नवापुर डॉक्टर्स असोशिएशन चे सर्व सदस्य ह्या शासन कार्यवाही तीव्र शब्दात निषेध करीत आहोत.

डॉक्टरांना पाठिंबा केला जाहीर
त्या सर्व डॉक्टर्सला आमचा पाठींबा जाहीर करतो, असे निवेदनामध्ये म्हटले आहे निवेदना वर डॉक्टर्स असोशिएशन अध्यक्ष डॉ कमलेश पाटील, उपाध्यक्ष डॉ.विशाल पाटील, डॉ.चंद्रशेखर पाटील, सचिव डॉ.भावीन पाटील, डॉ.जयवंत गिरासे, डॉ.यतीश पाटील, डॉ.अमित मावची, डॉ.विशाल वळवी, डॉ.अशुतोष वाडीले, डॉ.चेतन पाटील, आदीचा सह्या आहेत.