नवापूर तालुक्यात रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
कामात धनराट, सोनखडका, करंजी बु., बोरपाडा, दापूर या गावांचा समावेश
नवापूर। तालुक्यातील धनराट, सोनखडका, करंजी बु., बोरपाडा, दापूर प्रजिमा 30 या रस्त्याच्या कामाचा भुमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी आ.शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचा श्रीफळ फोडून शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आ.नाईक यांचा करंजी बु.चे सरपंच प्रमिला गावित यांनी ग्रा.पं.च्यावतीने सत्कार केला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जालमसिंग गावित, पं.स सदस्य राजेश गावित, करंजी बु.ग्रामपंचायतचे सरपंच प्रमिला गावित, आर.सी.गावित, रमेश गावित, शमुवेल गावित, जेकु गावित, सोनखडकाचे सरपंच बाळु गावित, माजी पं.स.सदस्य विजय गावित, आनंद वळवी, रुबजी गावित, रामा गावित, अश्वीन वसावे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
रस्त्याची मागणी बर्याच दिवसापासून ग्रामस्थांनी केली होती. रस्त्याच्या कामासाठी निवेदनही बर्याच वेळा ग्रामस्थांनी दिले होते. हे सर्व चित्र पाहता आ.शिरीषकुमार नाईक यांनी हा रस्ता मंजूर करुन दिला आहे. रस्त्यासाठी तीन कोटी 28 लाख मंजूर झालेले आहेत. हा रस्ता होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले