नवापूर नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला

0

नवापूर (हेमंत पाटील)। नवापूर नगरपालिकेची प्रभाग रचना व आरक्षण सोडतीनंतर नगरपालिका निवडणुकीच्या हालचाली गतिमान झाल्या असुन काहीच्या चेहर्‍यावर खुशी तर बहुतेकांना गम झाल्याचे दिसून येत आहे. नवापूर नगर पालिकेच्या 20 जागांसाठी काढण्यात आलेल्या सोडतीत अनेक विद्यमान नगरसेवकांचा चेहर्‍यावरील रंग उडाला आहे. तर अनेकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. काहीचे प्रभाग महिला आरक्षित झाले आहेत तर काही विद्यमान नगरसेवक लकी ठरले. नगराध्यक्षा रेणुका गावीत यांच्या प्रभाग सुरक्षित राहीला असून अनेक काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक पुन्हा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तर काही आपल्या पत्नीला किंवा आईचा उमेदवारी साठी प्रयत्न करीत आहेत. आरक्षण सोडतीनंतर अनेक इच्छुक प्रभागाची रचना, गणित, जाती, समाज अनेक दृष्टीकोन समोर ठेवून सुञ जुळवून चाचपणी करण्यात लागले आहेत. भाजप-सेना यांची युती होते की नाही की पून्हा ते संयुक्त लढतील हे अद्याप स्पष्ट नसले तरी युती व्हावी.

भाजप-सेना स्वबळावर लढण्याची चिन्हे
यासाठी स्थानिक भाजप-सेना पदाधिकारी प्रयत्नशील असल्याचे समजते तर दुसरीकडे वरिष्ठ पातळीवरून भाजपा स्वंतत्र लढविण्याचा प्रयत्नात आहे, असे बोलले जात आहे. तर शहरात अनेक वर्षापासून सामाजिक कार्य, समस्या सोडणारे स्वतंञ विचाराचे नागरिक एकत्र येऊन विकास आघाडी स्थापन झाली आहे. रजिस्टेशन देखील झाले हा गट प्रबळ मानला जात असुन अनेक छुप्पे पोलीटिशन, उद्योजक यांच्या पाठीशी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही निवडणूक चौरंगी, पंचरंगी होईल असे चित्र आहे. अनेक विद्यमान नगरसेवकांना अनेक प्रभाग सुरक्षित राहीलेले नाही तर काहीना सोयचे ठरले आहे तर अनेकांना पत्नी व आईला उभे करण्याची संधी मिळाली आहे. आरक्षणाचा फटका अनेकांना पडला आहे, अनेकांना इतर प्रभागाचा शोध घ्यावा लागत आहे. अनेक इच्छुक उमेदवार नवीन प्रभाग रचना समजून घेत आहे अनेक ठिकाणी समोरा समोरील घरे सुध्दा दुसर्या प्रभागात जोडली गेली त्यामुळे काही जणांना निवडणूकीपासुन दुर रहावे लागणार आहे. त्यामुळे सध्या कही खूशी कही गम चा माहोल पाहायला मिळत आहे. गल्लोगल्ली, गटागटाने, प्रभाग रचना, आरक्षण, बैठका यावर चर्चा होत असली तरी इच्छुक मायारामची जुळवा करण्यात व्यस्त झाले आहे. जो तो नगरपालिका निवडणुकीचा विषय काढून रिमझिम पाऊसात गरमागरम भजी व चहा संग चर्चा रंगु लागल्या आहेत पक्ष कार्यालय गर्दीने गजबजु लागली आहे. यंदा गणपती उत्सव हराभरा राहणार असून भावी नगरसेवकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

जर-तर…
मागच्या निवडणुकीत भाजपा-सेना उमेदवार युती करून लढले असते तर त्यावेळी भाजप सेनेचे चार ते पाच उमेदवार निवडून आले असते असे गणित निवडणूक निकालानंतर दोघ पक्षांचा पराभुत उमेदवारांना मिळालेल्या मतावरून स्पष्ट झाले होते. काही उमेदवार फार थोड्या मतांनी पडल्याचे शल्य आज ही बोलुन दाखवतात म्हणुन भाजपा सेना युती करणे फायद्याचे आहे, असे बोलले
जात आहे.

सर्व पक्ष चांगल्या उमेदवाराच्या शोधात
नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष प्रबळ व चांगल्या उमेदवार शोधत आहे अनेक ठिकाणी गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत अनेक जण रोज प्रभागात जाणुन मतमतांतरे जाणुन घेत आहे. गटतट पक्ष विसरून आपल्या जातीचा, समाजाचा, जवळचा उमेदवार उभा करून निवडुन आणण्यासाठी गुप्त बैठका व चर्चा रंगली आहे पावसाची संततधार आणि त्यात निवडणूकीची गरमागरम चर्चा सध्या सुरू आहे. निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे.

नगरपालिकेत सध्याची परिस्थिती
नवापूर नगरपालिकेत दोन पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीची सत्ता वगळता ग्रामपंचायत पासुन सध्या नगर पालिकेत काँग्रेसची सत्ता राहीली आहे गेल्या निवडणुकीत 18 पैकी 13 जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे चार व एक अपक्ष उमेदवार निवडून आले होते.

नवापूर पालिका राहीली चर्चेत
गेल्या पाच वर्षांत नगरपालिकेमार्फत अनेक विकास कामे झाली त्याच बरोबर नगर पालिकेत लोकांचा अनेच समस्या, तक्रारी, मोर्चा, निवेदने, उपोषण, निकृष्ट डांबरीकरण प्रकरण, प्रलंबित जलशुध्दीकरण केंद्र, आरोग्याचा प्रश्न यासह अनेक गोष्टी चर्चेत राहीली आहेत.

सोशल मीडियावर इच्छुक उमेदवार
नगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचा फोटो पोस्ट फेसबुक व वॉटशॉपवर झळकु लागले असून विकासांचा अंजठा फिरवला जात आहे अनेक जण शहरातील लहान सहान नागरिकांचा सुख दुखांत हजेरी लावतांना दिसत आहे अनेक कार्यक्रमात दिसु लागले आहे यात युवकांचा भरना जास्त आहे.

नगराध्यक्षासाठी ही नावे आहेत चर्चत
नवापूर नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला असुन काँग्रेस तर्फे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते गिरीश गावीत यांच्या पत्नी पुष्पा गावीत, माजी नगराध्यक्ष विपीन चोखावाला यांच्या पत्नी मिराबेन चोखावाला तसेच साजेदा बलेसरिया तर भाजपा तर्फे विद्युलता नांद्रे, शैलाबाई टिभे तर राष्ट्रवादी पक्षाकडून विरोधी पक्ष गटनेते नरेंद्र नगराळे यांचा पत्नी डॉ.अर्चना नगराळे यांची नावे चर्चेत आहेत.