नवापूर नगरपालिकेचा 35 वा वर्धापनदिन साजरा

0

नवापूर । नवापूर नगरपालिकेचा 35 व्या वर्धापन दिवस साजरा करण्यात आला यावेळी न.पा मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे यांनी नवापुर नगरपालिकेचा प्रवेश व्दाराजवळ पुजन करुन श्रीफळ फोडले, यावेळी कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे,प्रकल्प अधिकारी प्रशांत भट,परशराम ठाकरे, राजु चव्हाण,राजु गावीत,भगवान महाले,गिरीष सांगळे,आदी उपस्थित होते.

नवापुर नगरपालिकेला ही 11 नोव्हेंबर 1982 रोजी स्थापन झाली. पालिकेला आज 35 वर्ष पुर्ण झाले असुन यावेळी कर्मचारी यांनी वर्धापन दिवस मोठ्या उत्सवात साजरा केला.यावेळी कर्मचारी यांनी पेढे वाटप करुन अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या. ग्राम पंचायत त्यानंतर नगर पालिकेत रुपांतर झाले, स्थापना झाली त्यावेळी नगरपालिका झाली त्यावेळी कौलारु इमारत होती व 1995 रोजी नविन इमारती कामाला सुरुवात झाली होती आज नवापूर नगर पालिका 35 वर्षाची झाली आहे.