नवापूर नगरपालिकेतील काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचे पद धोक्यात !

0

नंदुरबार। नवापूर नगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे नगरसेवक दर्शन प्रताप पाटील व सारीका मनोहर पाटील यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीकडून अवैध घोषीत केल्याने या दोघांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे. या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी सूचना जात पडताळणी समितीने तहसिकदारांना केली आहे. त्यामुळे राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

अर्जदार अतुल दिलीप तांबोळी व नॅन्सी राकेश मेहता यांनी दर्शन पाटील व सारीका पाटील यांच्या जात प्रमाणपत्रावर संशय घेऊन चौकशीशी मागणी केली होती. या दोन्ही नगरसेवकांनी स्वताला माळी या जातीचे दाखवुन तर मागास प्रवर्गाचा दाखला मिळवला होता. इतर मागास प्रवर्गातुनच नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. त्या आधारे नगरसेवक झाले. मात्र तक्रारदाराने जात प्रमाणपत्र बोगस असल्याबद्दल जात पडताळणी समिती समोर तक्रार दाखल केल्याने त्याची सखोल चौकशी करण्यात येऊन वरील निर्णय देण्यात आला आहे. यासाठी माळी समाजाच्या वतीने देखील पाठपुरावा करण्यात आला होता. समिती समोर अर्जदार अतुल तांबोळी व नॅन्सी मेहता यांच्यातर्फे जेष्ठ विधीज्ञ अँड.धनराज गवळी यांनी युक्तिवाद केला. त्यांना अँड.रोहन गीरासे ,अॅड.ऊमेश शींत्रे अॅड.हीतेंद्र राजपूत व अँड शुभांगी चौधरी यांनी सहकार्य केले, दर्शन पाटील व सौ सारीका पाटील यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आल्याने त्यांच्यावर आता अपात्रतेची कारवाई होते की का? याकडे लक्ष लागून आहे,