नवापूर । नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु असुन दहा प्रभागात प्रचाराची धुम सुरु आहे. नगरसेवकपदाचे उमेदवार जोरात असतांना ऩगराध्यक्षपदाचे उमेदवारांनी आपला प्रचार गतीमान केला आहे. नवापूरकर दुसर्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणार आहेत. नगराध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून हेमलता अजय पाटील,भाजप-सेना युतीच्या ज्योती दिपचंद जयस्वाल,राष्ट्रवादीकडुन डॉ. अर्चना नरेंद्र नगराळे (वळवी) शहर विकास आघाडीच्या सोनल धर्मेद्र पाटील,बहुजन समाज पार्टीचा संगीता गजानन सावरे,समाजवादी पक्षाच्या शेख अज्मीना जावेद रिंगणात आहेत.
सर्वपक्षीय उमेदवार रिंगणात
नवापूरकरांना पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष निवडुन द्यावयाचा आहेत. नवापूर नगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर 35 वर्षाचा कार्यकाळात दुसर्यांदा थेट जनतेतुन निवड नगराध्यक्ष निवड केली जाणार आहे. पहिल्यादा नवापूरकरांनी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा व नगरसेवक काँग्रेसचे निवडुन दिले होते. नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा व बहुमत काँग्रेसचे अशी परिस्थिती होती. यावेळी अनेक घडामोडी व अस्थिर परिस्थितुन पालिकेला जावे लागले आहे. नगरपालिकेची पहिली निवडणुक झाली त्यावेळी 22 वार्ड होते. नगरसेवक नगराध्यक्षाची निवड करायचे सलग चार पंचवार्षिकमध्ये नगरसेवकांमधुन नगराध्यक्ष निवड करण्यात आली. पाचव्या पंचवार्षिकेत बदल होऊन प्रथमच थेट जनतेतुन नगराध्यक्ष निवडीचा अनुभव नवापूरकरांनी अनुभवला. सुरुवातीला विपिन चोखावाला नगराध्यक्षपद यांनी सांभाळले चौथ्या पंचवार्षिक पर्यत विपिन चोखावाला यांचाकडेच नगरसेवकांनी नगराध्यक्ष सोपवले. यानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडणुकीत नवापूरकरांनी राष्ट्रवादी काँग्रसचे गोविंदराव वसावे यांना निवडुन आणले होते. यावेळी गोविंदराव वसावे यांनी विपिन चोखावाला याचा दारुण पराभव करुन परिवर्तन घडवले होते. मात्र नगराध्यक्षपदाचा तीन वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केल्यानंतर गोविंदराव वसावे यांचा विरोधात त्यावेळी नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करुन पाय उतार केले होते. राष्ट्रवादीचे काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार डॉ. अर्चना नगराळे यांनी तर दोन वर्षापासुन तयारी सुरु केली होती. याची पुर्व तयारी त्याचे पती नरेंद्र नगराळे यांनी करुन ठेवली होते. भाजपा सेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ज्योती जयस्वाल यांनी ही तयारी करुन ठेवली होती.