नवापूर नगराध्यपदी कॉग्रेसच्या हेमलता पाटील विजयी

0

20 जागांपैकी 14 जागा काँग्रेसच्या ताब्यात
नवापूर । नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा अंतिम निकाल हाती लागला असून काँग्रेसच्या हेमलता पाटील यांचा 1736 मतांनी विजय झाला आहे. त्यांना 7911 मते मिळाली. त्यांनी भाजपच्या ज्योती दीपचंद जैस्वाल यांचा पराभव केला. दरम्यान, नगरसेवकपदासाठी असलेल्या 20 जागांपैकी 14 जागांवर काँग्रसने विजय मिळविला असून राष्ट्रवादी 4, शिवसेना 1 तर एका जागेवर अपक्षांनी विजय मिळविला आहे. सुरूवातील दुसर्‍या फेरी अखेर कॉग्रसच्या हेमलता पाटील यांनी 878 मतांची आघाडी घेतली होती. त्यांना 2 हजार 465 मते मिळाली होती तर राष्ट्रवादीच्या डॉ. अर्चना वळवी यांनी 1587 मते आहे. तर भाजपाच्या ज्योती जयस्वाल तिसर्‍या स्थानावर होत्या त्यांना 946 मते मिळाली आहे.