नवापूर पालिकेत मतदान, गोंधळ, अन् एका सभापतीची निवड लांबणीवर

0

नवापूर । पालिकेच्या पाच विषय समिती सभापतींची निवड प्रक्रिया आज पालिका सभागृहात पार पडली. पाच पैकी महिला व बालकल्याणसाठी राष्ट्रवादीच्या सविता मनोहर नगराळे यांनी तर बांधकाम समितीसाठी मीनल लोहार यांनी अर्ज भरले. राष्ट्रवादीकडून अर्ज आल्याने हात उंचावून मतदान घेण्यात आले. उर्वरित समित्यांची निवड बिनविरोध झाली. आरोग्य समिती सभापती पदाची निवड नंतर घेण्यात येणार आहे. नवापूर नगरपालिका विषय समिती निवड प्रक्रिया नगरपालिका सभागृहात पार पडली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन तहसीलदार प्रमोद वसावे व मुख्यधिकारी राजेंद्र शिंदे उपस्थित होते यावेळी नगराध्यक्षा हेमलता पाटील व उपनराध्यक्ष आयुब बलेसरीया सह सर्व नगरसेवक उपस्थित होते. यावेळी.नामनिर्देशन भरण्याची प्रक्रिया सकाळी 9 ते 11 दरम्यान होती. नगरपालिकेचे उपाध्यक्ष हे नियोजन आणि विकास समितीचे पध्दसिध्द सभापती असतील असे ठरविण्यात आले.

आक्षेपानंतर अर्ज अपात्र
आरोग्य सभापती विषय समिती निवड प्रक्रिया नगर पालिका सभागृहात सुरु असतांना आरोग्य सभापती पदाचे उमेदवार नगरसेवक विश्‍वास बढोगे हे उशिरा आले तत्पुर्वी नगरसेवक आरीफ पालावाला यांनी उमेदवारी अर्ज भरला यावर गटनेते नरेंद्र नगराळे यांनी आक्षेप घेतल्याने पीठासिन अधिकारी तहसीलदा प्रमोद वसावे यांनी छाननी केली असता त्यात नामनिर्देशन पत्रात खोडाखोड तसेच उमेदवार व अनुमोदक यांचा नावात तसेच कोण सभापती पदासाठी निवडणूक लढू इच्छीतो व कोण अनुमोदन करीत आहे, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने नामनिर्देशन पत्र नामंजुर करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने आरोग्य सभापती सोडून अन्य समित्यांसाठी अर्ज दाखल केले होते. त्यांनी जर आरोग्य सभापती साठी अर्ज दाखल केला असता तर आज सत्ताधारांसोबत राष्ट्रवादी या विरोध गटाचे आरोग्य सभापती राहिले असते.

समिती सभापती व सदस्य असे
सार्वजनिक बांधकाम समिती : सभापती- हारुन शबिर खाटीक, सदस्य:- आरीफ इब्राहिम बलेसरिया, बंटी चंदलानी, रेणुका गावीत ,मिनल लोहार.
स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती : सभापती पद रिक्त आरोग्य सभापती वगळता सदस्य म्हणुन बलेसरिया आरिफ इब्राहिम ,मंगला सैन, महिमा नितेश गावीत, विश्‍वास बढोगे ,खलील रज्जाक खाटीक.

नियोजन व विकास समिती : सभापती- उपनगराध्यक्ष;-आयुब महमंद बलेसरिया, सदस्य:- दर्शन पाटील, गिरीष गावीत, बबीता वसावे, खल्लील रज्जाक खाटीक.
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती : सभापती- आशिष मावची, सदस्य म्हणून विशाल केशव सांगळे,मंजु मुकेश गावीत,यश सुनिल अग्रवाल,नरेंद्र देविदास नगराळे,
महिला व बालकल्याण समिती : सभापती सारीका मनिष पाटील, सदस्य -मंगला विजय सैन, बबीता पाच्या वसावे, सुरैय्या फारुक शहा, सविता मनोहर नगराळे.
स्थायी समिती : पदसिध्द सभापती नगराध्याक्षा हेमलता अजय पाटील हे असतील तर सदस्य म्हणुन आयुब महमद बलेसरिया ,आशिष फतु मावची,सौ सारीका मनिष पाटील, हारुन शबीर खाटीक, बंटी इंद्रलाल चंदलानी,हे असतील अशी निवड करण्यात आली आहे या निवड प्रक्रिये साठी न.पा कार्यालय निरीक्षक मिलिंद भामरे,वामन अहिरे,किसन वाडेकर,अंनत पाटील,डी.पी कुलकर्णी आदीनी काम पाहीले.