नवापूर पालिकेसाठी राजकीय पक्ष सक्रीय

0

नंदुरबार येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार तथा भाजपाचा जिल्हाध्यक्ष डॉ. हिना गावीत यांनी नोव्हेबर अखेर होणार्‍यां पालिका निवडणुक भाजपा स्वबळावरच लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळ सध्यातरी आता शिवसेना-भाजपा युतीची शक्यता मावळली आहे. दोन्ही पक्ष स्वबळावरच लढतील असेच चित्र आहे. तसेच शहादाप्रमाणे नवापुर पालिका निवडणुकीत एमआयएम हा पक्ष मोजक्या प्रभागात उमेदवार उभे करुन त्यांना निवडुन आणणार असल्याचे एमआयएमचा एका पदाधिकार्‍यांने बोलतांना सांगितले. शहरातील सामाजिक कार्य करणारे युवा वर्गाने नवापुर विकास आघाडीची स्थापना करुन ते ही निवडणुक रिंगणात उतरणार आहेत. ते निवडणुक पुर्व एक आवाहन उभे करु पाहत असुन महत्वाचे प्रश्न, शहरातील विविध समस्या,निवेदने,प्रश्न, शासन दरबारी मांडुन शहरवांशीयांचे लक्ष वेधले आहे.

विकास आघाडीचे भावी नगरसेवक सध्या जोमात आहेत. काँग्रेस पक्षात सध्या शांतता आहे. पण ही शांतता वादळापुर्वींची आहे. दोन पंचवार्षिक वगळता काँग्रेस पक्षाने नगरपालिकेत सत्ता आज पर्यत कायम ठेवली आहे. नगराध्यक्ष रेणुका गावीत व गटनेते गिरिष गावीत यांच्या कुशल नेतुत्वाने शहरात विविध विकास कामे झालेली आहेत. एक दोन नगरसेवक वगळता इतरांची प्रोग्रेस रिपोर्ट चांगला असल्याचे बोलले जात आहे. तर काहींचा बाबतीत रहिवांशांचा अनेक तक्रारी असुन त्यांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी नाराजी आहे असे बोलले जात आहे. असे असले तरी विकास कामाचा जोरावर आ. सुरुपसिंग नाईक व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री माणिकराव गावित यांच्या मार्गदर्शनाने माजी जिप अध्यक्ष ,युवा नेते भरत गावीत व आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन,युवा नेते शिरिष नाईक यांच्या कुशल नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष पालिका निवडणुकीत पुन्हा सत्ता स्थापनेसाठी उतरणार आहे. दरम्यान विद्यमान नगरसेवकांनाच पुन्हा तिकीट दिले जाते की नवीन चेहर्‍यांना संधी दिली जाईल याकडे लक्ष लागुन आहे. काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. पत्ताअजुन ओपन झालेला नाही. मात्र आतुन चर्चा रंगत आहे. याबाबत सर्वच पक्ष सावध पवित्रा घेतांना दिसत आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार सर्व बाजुंनी प्रबळ असला पाहीजे या दृष्टीने सर्वच पक्ष विचार करत असल्याचे चित्र आहे. इच्छुक उमेदवार नगरसेवकपदाचे तिकिट मिळावे म्हणुन पक्ष नेत्यांचा संपर्कात असुन कार्यालयात चकरा मारतांना दिसत आहे. विविध कार्यंक्रमात आवर्जुन उपस्थिती पाहायला मिळत आहे. सध्या तरी प्रचाराचा बार सोशल मिडीयावर सुरु असुन अनेक भावी नगरसेवक निवडणुक डोळ्यासमोर ठेवुन मते कॅश करण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.

यंदाचा निवडणुकीत युवा वर्ग जास्त दिसुन येणार असुन सध्या तरी तेच फॉर्ममध्ये दिसुन येत आहे.निवडणुकीत नेहमीच चर्चेत असलेले व राष्ट्रवादी पक्षाला पालिकेत सत्ता मिळवुन देणारे किंगमेकर दिलीप नाईक यांची भुमिका अद्याप स्पष्ट झाली नसुन ते निवडणुकीत कोणती गुगली फेकतात याकडे लक्ष लावुन आहे. कारण मागील निवडणुकीत त्यांचा प्रचार कुशलतेने अनेकांची दांडी उडाल्याचा इतिहास नाकारुन चालणार नाही. सध्या तरी वेट अँड वाँचचा भुमिकेत सर्व वावरत आहेत. प्रभागात जाऊन मतदारांची भेट घेऊन माहिती काढत आहे. निवडणुकवारे गतिमान होऊ पाहत असुन नगर पालिकानिवडणुकीसाठी आता प्रभाग रचना हरकती ही निकाली निघाल्याने मार्ग मोकळा झाला आहे. राजकीय घडामोडी चुप के चुप गतिमान होत आहेत. नवापुर प्रभाग रचनेवर एक ही हरकत आली नसल्याने प्रभाग रचनेवर नवापुरकर समाधानी असल्याचे यावरुन दिसुन आले आहे. निवडणुक विभागाने ही नोव्हेबरमध्ये होणार्‍या निवडणुकींसाठी तयारी करत आहे. यंदा मतदारसंख्या वाढणार असुन इच्छुक उमेदवार प्रभागात जाऊन सध्या चाचपणी करत आहे. मतदार संख्या,मतदारांचा कल,कोणत्या समाजाची किती मतदार आहेत. बाहेर गावी किती गेले आहेत. प्रभागाची व्याप्ती हे तपासुन त्यावर त्यांचा अभ्यास इच्छुकांसाठी सुरु असल्याचे चित्र आहे. सध्या दोन ते अडीच महिना शांतता राहणार असली तरी राजकीय पक्षांची आतुन तयारी मात्र सुरु झाली आहे. वातावरण निर्मिती हळुहळु होणार आहे तुर्त एवढेच…

– हेमंत पाटील, नवापूर
9823610627