नवापूर । येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 5 व 6 जानेवारी रोजी आधुनिक जगातील आदिवासी समुदायाचे राजकारण या विषयावर दोन दिवसीय आंतराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. देश विदेशातील तज्ञांमध्ये विचारमंथन होणार असल्याची माहिती या परिषदेचे निमंत्रक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ ए जी जयस्वाल व परिषदेचे संयोजन सचिव प्रा ए. बी. महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तुलनात्मक चर्चा
महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोक प्रशासन परिषदेचे 35 वे अधिनेशन भारतातील सध्याचा राजकीय विकास, समस्या आणि आव्हाने या विषयावर आयोजित करण्यात आले आहे. या विषयाचा आयोजनासाठी राज्यशास्त्र विषयाचा अभ्यासकांना अत्याधुनिक विषयज्ञान प्राप्त करता यावे, हा या परिषदेचा मुख्य हेतु आहे हा पहिलाच प्रयोग असल्याचे प्राचार्य जयस्वाल यांनी सांगितले. त्याच बरोबर महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्हा म्हणुन नंदुरबार जिल्हा असुन या जिल्हात नवापुर तालुक्यातील आदिवासी समाजाच्या सुक्ष्म अभ्यास करण्यासाठी तसेच त्याच्यांत नवदृष्टीकोण निर्माण व्हावा व त्या बरोबर आदिवासी समुदायाची विचारणी व सद्यराजकारण याची तुलनात्मक चर्चा खुल्या स्वरुपात करुन योग्य त्या निकर्षा प्रत पोहचता यावे. हा आंतरराष्ट्रीय परिषदेचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.
यांचा असेल समावेश
डॉ.एस.एस.काजी (बांग्लादेश), प्रा धनपंडीत (नेपाळ), डाँ आडेसिना कल्सुहाया (नायझिरिया), डाँ सुनीलकुमार गोयल (मध्य प्रदेश भारत), डाँ लियाकत खान (मुंबई), डाँ प्रकाश पवार(कोल्हापूर), डाँ प्रशांत अमृतकर (औरंगाबाद), डाँ अलीम वकील (चांदवड), डाँ शुभदा ठाकरे (धुळे), डाँ पी एम वसावे (शहादा)हेआंतरराष्ट्रीय परिषदेचे साधन व मार्गदर्शक व्यक्ती म्हणुन उपस्थित राहणार आहेत .तसेच महाराष्ट्र राज्य्शास्त्र व लोक प्रशासन परिषदेचे 35 वेअधिवेशन संपन्न होत असुन या अधिवेशनाचे संमेलनाध्यक्ष नागपूरचे डाँ मोहन काशिकर हे बीज भाषण देणार असुन परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डाँ पी डी देवरे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
विविध कार्यक्रम
आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन नंदुरबार या आदिवासी जिल्हातील नवापूर येथे होत आहे. परिषद ही मोठी खर्चीक आहे मात्र यासाठी संस्थेचे पाठबळ मिळाले आहे महिना भरापासुन तयारी सुरु आहे. 120 शोध निंबध देश विदेशातुन आले असून 12 विदेशातील तज्ञांचा या परिषदेत सहभाग आहे. शोध निबंधाचे पुस्तक सादर करुन करणार आहेत. याच ठिकाणी पुस्तकाचे प्रकाशन देखील होईल.