नवापूर । येथील शिंपी समाजाच्या माजीअध्यक्षा प्रा.कविता प्रकाश खैरनार यांची शिंपी समाजाच्या मध्यवर्ती संस्थेच्या महिला सदस्या म्हणून निवड करण्यात आली. प्रा. कविता खैरनार यांनी महिलांसाठी विविध उपक्रम राबविले असुन त्या येथील माजी समाजध्यक्ष स्व.मधुकर खैरनार यांच्या स्नुषा असुन शिंपी समाजाचे सचिव व पत्रकार प्रकाश खैरनार यांच्या पत्नी आहेत.त्यांनी महिला साठी विविध वक्त्यांची व्याख्याने, विविध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, उखाणे स्पर्धा, एक मिनिटं शो, समाजातील लहान बालकांसाठी विविध खेळ आदि यशस्वी उपक्रम राबविले आहे.त्यांच्या या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.