नवापूर येथील मुख्य रस्त्यांच्या कामास सुरूवात

0

नवापूर । येथील मुख्य रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्यांवरून चालणे देखील मुश्कील झाले होते. या रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी नवापूर विकास आघाडीद्वारे करण्यात आली होती. तसेच दै. जनशक्तिने शहरातील रस्त्यांची व नागरी समस्याबाबत ठळक प्रसिद्धी दिली होती. या समस्यांबाबत तहसीलदार प्रमोद वसावे यांची प्रत्यक्ष भेट घेवून विकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी लक्ष वेधण्यात आले.

नगरपालिकेचा भोंगळ कारभार उघड
यावेळी निवेदन देऊन नवापूर नगर पालिकेचा भोंगळ कारभार उघड करण्यात आला. यानंतर लागलीच तहसीलदार प्रमोद वसावे यांनी निवेदनाची दखल घेत नगरपालिका उ ज ना आपल्या कार्यालयात न बोलवता सरळ तहसीलदार यांनी स्वतः नगर पालिका कार्यालय गाठून अधिकार्‍यांची कान उघडणी केल्याने नपा प्रशासनाने त्वरित निवेदनाबाबत नवापूर विकास आघाडीच्या पदाधिकारीना बोलावून समस्यां जाणून घेतल्या.

नागरिकांनी व्यक्त केले समाधान
आज दै. जनशक्ती व नवापूर विकास आघाडीच्या दणक्यामुळे अखेर रस्त्याचे दुरुस्तीचे काम युद्ध स्तरावर सुरु करण्यात आल्याने आज शहरातील नागरिकांनी दै. जनशक्ति , नवापूर विकास आघाडी आणि तहसीलदार प्रमोद वसावे यांची दखल घेऊन सुरु केलेल्या कामाबद्दल समधान व्यक्त केले आहे.