नवापूर । बीएपीएस प्रमुख स्वामी हॉस्पीटल सुरत तथा अग्रवाल समाज नवापूर यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रवाल भवनात मोफत आरोग्य तपासणी व सर्वौपचार शिबीरात 264 रुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन अग्रवाल समाज अध्यक्ष सुभाष अग्रवाल व कमलेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रसिद्ध ज्योईंट रिप्लेसमेंट व अर्थोपिडीक सर्जन डॉ भद्रेस राठोड,दक्षिण गुजरातचे प्रसिद्ध सर्जिकल गेस्ट्रोएट्रोलोजीस्ट ,डॉ नरेश गबाणी, डॉ आनंद मोदी बालरोग तज्ञ डॉ किरीट सिसोदिया,युरोलोजीस्ट डॉ भरत छेटा,डॉ जुनेद पठाण बाजार समिती संचालक राजेंद्रभाई अग्रवाल,कमलेशभाई अग्रवाल,प्रा.आर आर पाठक,प्रदीपभाई प्रजापत राजू नरसीभाई अग्रवाल विकास शाह,छगनभाई प्रजापत महेंद्रभाई पटेल,वीरचन्दभाई अग्रवाल,फकीरभाई अग्रवाल संजयभाई अग्रवाल, महेन्द्र जाधव अशोक रणधीरे,रणजीत पाटील शरद लोहार दर्शन पाटील उपस्थित होते. दरम्यान या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरानी मूत्रपिंड ,गुडघेदुखी,पोटाचे विकार,वृधयरोग ,फुपूस, ब्लडप्रेशर,डायबिटीज,आदी विविध रोगाबाबत 264 रुग्णांची तपासणी करण्यात आली यशस्वीतेसाठी सुरेखाबेन अग्रवाल शीतल अग्रवाल मनीष अग्रवाल,प्रणव पाटील यांनी परिश्रम घेतले.