नवापूर। जागतिक जलदिन निमित्त जलजागृती साप्ताह निमित्त येथील सार्वजनिक प्राथमिक मराठी शाळेत विविध कार्यक्रम घेण्यात आलेत.शिक्षणाच्या माध्यमातून भावी पिढी निर्माण व्हावी त्यांना पाण्याचे महत्व पाणी संवर्धन पाणी प्रदूषण व दुष्परिणाम त्यावरील उपाय यांची जनजागृती व्हावी यासाठी जलजागृती साप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम धेण्यात आलेत. जलजागृती साप्ताह अंतर्गत शाळे तर्फे विद्यार्थ्यांकडून जलप्रतिज्ञा वाढवून घेण्यात आली शहरात विद्यार्थ्यांनी जलजागृतीसाठी प्रभात फेरी काढली या प्रभात फेरीचे उद्घाटन नगरसेविका सौ मेघा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन विषयक घोषणा वदवून घेण्यात आल्या.मुख्याध्यापक महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली या जलजागृती साप्ताह अंतर्गत शालेयस्तरावर निबंध स्पर्धा वकृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा व विविध कार्यक्रम घेण्यात आलेत यशस्वितेसाठी मनीषा भदाणे योगिता पाटील माधुरी चिते , रेसा मावची यांनी परिश्रम घेतले.