नवापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न !

0

आदिवासी समाजाने केले आंदोलन ; आंदोलकांना पोलिसांकडून अटक व सुटका

नवापूर- आदिवासी समाजाच्या न्याय हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचया निषेधार्थ नवापूर येथील समस्त आदिवासी बांधवानी नवापूर पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना निवेदन दिले तसेच फडणवीस यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पाडला. आंदोलकांनी पोलिसांनी अटक केली तर काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

फडणवीसांच्या भूमिकेचा निषेध
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमाशी बोलतांना सांगितले की, धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. केंद्र सरकारकडुन मंजुरी मिळाल्यावर धनगर समाजाचा आदिवासी समाजात समावेश करण्यात येईल त्यामुळे आदिवासींविरुध्द वकत्व्य व भूमिका घेतल्याचा येथे निषेध करण्यात आला. तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भरत गावीत, विनायक गावीत, पं.स.उपसभापती दिलीप गावीत, आर.सी.गावीत यांनी महमानवाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.