नवापूर । येथील सार्वजनिक गुजराती हायस्कूलमध्ये संस्थेच्या संचालिका शीतलबेन वाणी,उद्योजक नितीन वाणी,मह्म्मद मुल्ला,फकिर अग्रवाल,मुख्यध्यापक संजय जाधव,उपप्राचार्य हासीफ शेख,छोटा सर,जब्बार मुल्ला,हितेंद्र पाटील,बी.डी.जोशी व शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
शालेय परीसरात विविध जातीची झाडे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याचे त्याचे जतन करणे आपली व समाजाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन मुख्यध्यापकानी यावेळी केले. सदर कार्यक्रमात शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.