नवापूर येथे शिवाजी हायस्कुलात राबविले स्वच्छ परिसर उपक्रम

0

नवापूर – येथील श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
करण्यात आली. त्यानंतर स्वच्छ शाळा परिसर हा उपक्रमातर्गत शालेय परिसर विद्यार्थानी स्वच्छ केला. प्राचार्य विनोदकुमार पाटील,
उपमुख्याध्यापक भरत पाटील, उपप्राचार्य एस.आर.पहुरकर, पर्यवेक्षक हरीष पाटील, पर्यवेक्षिका सावित्री पाडवी, पर्यवेक्षिका कमल कोकणी
यांनी प्रतिमेचे पुजन करुन महापुरुषांना आदरांजली वाहण्यात आली. उपमुख्याध्यापक भरत पाटील यांनी महात्मा गांधी यांचा जीवन
कार्यावर प्रकाश टाकुन त्यांचे कार्य विद्यार्थाना सांगितले तर अशोक रजाळे यांनी लालबहादुर शास्त्री यांचा कार्याची माहिती विषद केली.
राज चव्हाण व तन्मय चव्हाण यांनी संगीताची साथ दिली.अर्चना बिरारी व कल्पना वसावे यांनी यासाठी परिश्रम घेतले.

शहरातून काढली रॅली
कार्यक्रमानंतर शहरातुन रॅली काढण्यात आली. संडास बांधा घरोघरी, स्वच्छता नांदेल त्यांचा दारी, स्वछ शहर सुंदर शहर, जय जवान-जय
किसान अशा घोषणांनी परिसर दणाणला रॅली शहराच्या मुख्य मार्गावरुन जात महात्मा गांधी पुतळ्याजवळ आली विद्यार्थानी घोषवाक्याचे
फलक लावुन जनजागृती केली याठिकाणी भरत पाटील, हरीष पाटील, सावित्री पाडवी, कमल कोकणी यांनी महात्मा गांधीचा पुतळ्याला
पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. फलक लेखन कलाशिक्षक योगेश सोमवंशी, आर.डी.गावीत, अतुल वसावे यांनी केले.