नवापूर । येथील पालिकेकडुन शहरातील विविध भागात पावणेदोन कोटी रुपये खर्चून होणार्या विविध विकासकामांचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत गावीत व साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक यांच्या हस्ते या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रथमच विकास कामांना शहरात सुरुवात करण्यात आली.
काँक्रीट रस्त्याचे भूमिपुजन
कलालगल्लीत 14 लाख 22 हजार रुपये खर्चून उभारण्यात येणार्या काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत गावीत व आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, नगराध्यक्षा हेमलता पाटील, उप नगराध्यक्ष अय्युब बलेसरिया यांच्या हस्ते करण्यात आले. एकुण 11 विकास कामांवर एक कोटी 76 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. या भूमिपूजन प्रसंगी माजी नगराध्यक्ष विपिनभाई चोखावाला, पालिकेचे सभापती आशिष मावची, विश्वास बडोगे, सारिका पाटील, सत्ताधारी व विरोधी गटातील नगरसेवक, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, अभियंता सुधीर माळी, राजेंद्र चव्हाण, राजु गावीत, अजय पाटील, रसुल पठाण, मेघा जाधव, हेमंत जाधव, जमील पठाण, भटेश पाटील, प्रशांत ठाकरे, कामील सैय्यद, आत्माराम ठाकरे, सुभाष कुंभार, मनिष पाटील, विजय सैन, नईम शेख, हरिष पाटील, मिलिंद निकम व परिसरातील महिला व युवक मोठ्या संख्येत उपस्थित होते.