नवापूर शहरातून महाविद्यालयातर्फे तंबाखुमुक्तीसाठी जनजागृती रॅली

0

नवापुर । येथील श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात तंबाखुमुक्त शाळा अभियाना अंतर्गत शहरातुन जनजागृती रॅली काढण्यात आली सुरुवातीला शाळेत मुख्याध्यापकांसह कार्यालयीन पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी पटांगणावर सामुहीकपणे तंबाखुमुक्तीची प्रतिज्ञा घेतली. यानंतर प्राचार्य अनिल पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांना तंबाखुचे दुष्पपरिणाम सांगुन मौलीक मार्गदर्शन केले. शिक्षक अशोक रजाळे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना प्रतिज्ञा दिली. जनजागृती रँलीचा शुभारंभ प्राचार्य अनिल पाटील यांनी केला.यावेळी उपमुख्याध्यापक विनोद पाटील, उपप्राचार्य एस.आर. पहुरकर, पर्यवेक्षक प्रविण पाटील, पर्यवेक्षक भरत पाटील, हरीश पाटील, कमल कोकणी तसेच शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. शहरातील मुख्य मार्गावरुन विद्यार्थानी फलक घेऊन घोषणा देत नागरीकांना तंबाखुचे दुष्यपरिणाम सांगुन तंबाखु खाऊ नका, असे आवाहन केले. यावेळी शिक्षक बंधु भगिनी उपस्थित होते.