नवापूर । नवापूर शहरात गेल्या 5 दिवसा पासुन प्लास्टीक पिशव्या जे दुकानदार ग्राहकांना देत आहे त्यांचावर नवापुर नगरपालिकेचा आरोग्य विभागा मार्फत कार्यवाही करण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असुन यासाठी शहरात स्वत: मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे व आरोग्य निरीक्षक भरत पाटील प्रत्येक दुकानात जाऊन ज्यांचा कडे प्लाँस्टीक पिशव्या आहेत.त्यांचावर कार्यवाही करुन पिशव्या जप्त करतांना दिसत आहे.पहिल्या दिवशी बसस्थानक भागात 75 किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या. दुसर्या दिवशी मेनरोड भागात 20 किलो,तिसर्या दिवशी आठवडे बाजारात शनिवारी 30 किलो प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत.
कलेक्टर आले पाहुन गेले
नवापूर शहरात एका कार्यक्रमात जिल्हाधिकारी डाँ कलशेट्टी आले होते होते.कार्यक्रमात येणारे लोक पुष्पहार,गुच्छ व इतर वस्तु प्लास्टीक पिशव्यात टाकुन येत होते. कलेक्टर साहेब हे सर्व पाहत होते.कार्यक्रम संपल्यावर प्लास्टीक पिशव्या अस्ताव्यस्त पडलेल्या पाहुन तेथे उपस्थित मुख्याधिकारी व इतर अधिकारी यांना नवापूर शहरात प्लास्टीक पिशव्या फार दिसताये, चांगला वापर होतोये असे सांगुन कानपिचक्या दिल्या होत्या तसेच प्लास्टीक पिशव्या वापराबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली होती
नवापूरातुन प्लास्टीक पिशव्या गायबे
मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांनी प्लास्टीक पिशव्या बंदी बाबत गंभीर दखल घेतली असुन शहरात ते स्वता फिरुन दुकानात जाऊन प्लास्टीक पिशव्या जप्त करतांना दिसत आहेत.त्यामुळे शहरात प्लास्टीक पिशव्या गायब झाल्या आहेत. त्यांचा या कारवाईचे स्वागत केले जात असुन अशीच कारवाई त्यांनी शहरातील वाहतुकीची कोंडी कडे पण दिली तर गंभीर ट्राफीक समस्या दुर होऊन नगर पालिका बेस्ट ठरेल अशी अपैक्षा नवापूककरांची आहे.
कारवाईत सातत्याची अपेक्षा
नवापूर शहरात नगर पालिकेने प्लास्टीक पिशव्या वर बंदीची कारवाई केल्या बदल स्वागत होत असुन ही कारवाई शो पीस न ठरता ती कायम असावी अशी अपैक्षा आहे.पर्यावरणाला घातक प्लास्टीक पिशव्याचे नवापूुर शहरातुन समुळ उच्चाटन होणे आवश्यक आहे. दरम्यान शहरात प्लास्टीक पिशव्या बंदी केल्या नंतर दुकानदाराला ग्राहकांना माल देण्यासाठी अडचण येत असुन त्यांनी ग्राहकांना कापडी पिशवी घेऊन येणे असा संदेश दिला आहे तसा फलक त्यांनी दुकानात लावला आहे. पालिकेतर्फे करण्यात येणार्या कारवाईत सातत्य ठेवावे अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्लॉस्टिक पिशव्यांची समस्या बिकट झाली आहे.