नवापूर शहरासह तालुक्यात गणेशमुर्ती बनविण्याच्या कामांना आला वेग

0

नवापूर । ऑगस्टला येणार्‍या गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे. गणेश मंडळांचा बैठका सुरू झाल्या आहेत. मुर्तीकार गणेशमूर्तीवर शेवटच्या हात फिरवत असतांना दिसून येत आहे. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणार्‍या कच्चा साहित्याचे दर वाढले असुन दरवर्षीपेक्षा गणेशमूर्तीचा किंमतीत यंदा 10 टक्के वाढ झाली आहे. पुर्वी नवापूर शहरात दोन तीन मुर्तीकार असायचे जवळच्या गुजरात व मध्य प्रदेश भागातुन गणेश मंडळे नवापूर शहरात मुर्ती खरेदी करत होते. मात्र काही वर्षांपासुन इतर जिल्ह्यातून पेणचा मुर्ती विक्रीसाठी येऊ लागल्याने स्थानिक मुर्तीकारांकडून मुर्ती खरेदी कमी झाली असल्याचे मुर्तीकार यांच्याकडून बोलले जात आहे.

गणेशभक्तांनी शाडु मातीच्या मुर्तींना प्राधान्य द्यावे
यंदा जीएसटी लागु झाल्याने सर्व कच्चा मालाचा किमती 18 टक्क्यांनी वाढल्या आहेत त्यामुळे मुर्तीचा किंमती महाग राहणार असल्याचे चित्र आहे माञ शहरातील स्थानिक मुर्ती कार यांनी याबाबत नो आय डी आय असल्याचे सांगितले दरम्यान शहरात गणेश मंडळांची लगबग सुरू झाली असून गणेशोत्सव एक महिन्यावर येऊन ठेपला आहे, काही दिवसांनी कॉलेज रोड भागात गणेश मूर्ती विक्रीची दुकाने सुरू होतील. शहरात गेल्या 47 वर्षापासुन गणेशमुर्ती बनवित असून शहरातील मानाचा दादा गणपती साडु मातीने बनविला आहे.

गुजरात व मध्यप्रदेशातूनही मुर्तीना मागणी
पुर्वी शहरात किसनाथ पाटील, घुशाभाऊ पेंटर हे दोनच मुर्तीकार होते त्यानंतर मी शास्ञी नगर येथील घरात मुर्ती बनवायला सुरुवात केली. शहर व तालुका तसेच गुजरात व मध्य प्रदेश राज्यातून मुर्ती घेण्यासाठी यायचे आता ही येतात, पुर्वी शाडुचा मातीचा गणेशमूर्ती असायचा कलरचे खडे फोडून त्याचे रंग बनवून कलर काम होत असल्याने शासनाने व गणेश भक्तांनी शाडु मातीने बनविलेल्या गणेश मुर्तीचा आग्रह धरावा कारण शाडु मातीने प्रदुषण होत नाही. पाण्यात ही लवकर विरघळते.

एमआयडीसीत जागेची मागणी
आताचे गणेशमूर्तीवर केमीकलयुक्त कलर असतात, गणेशमुर्ती या 5 ते 6 फुट उंच असाव्यात असे मला वाटते कारण विसर्जन करतांना ञास कमी होतो व शुध्दता असते, पुर्वी पासुन कमी जागेत मुर्ती तयार करत आलो आहे कमी जागेत खुपच अडचणी येत असतात. त्यामुळे शासनाने एमआयडीसीत आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी, दरवर्षी मागणी करतो मात्र अद्याप ती पूर्ण झाली नसल्याची खंत शहरातील प्रसिद्ध मुर्तीकार बापुभाऊ दुसाने यांनी ‘जनशक्ती’शी बोलताना व्यक्त केली.