नवापूर शहर व तालूका तेली समाजातर्फे निषेध

0

नवापूर – शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा येथील ज्ञानोपासक शिक्षण संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालयातून बालवाडीत शिक्षण घेणारी 5वर्षिय बालिकेवर अत्याचार करणार्या नराधमाला कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी नवापूर शहर व तालुका तेली समाजाच्या वतीने निषेध नोंदवत तहसिलदार प्रमोद वसा्वे यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात समाजाने नराधमावर कठोर कारवाई च्या मागणी सह, सदर घटना समाजाला काळीमा फासणारी असून त्या घटनेचा तिव्र संताप समाजात व्यक्त होत आहे.सदर गुन्ह्याचा तपास विशेष पथकाकडे देण्यात यावा, पोसा कायद्यातंर्गत तपास व्हावा, खटला अतिशिघ्र न्यायालयात चालवण्यात यावा, विषेश सरकारी वकिलाची नियुक्ती करण्यात यावी, पिडित मुलीला शासकिय धोरणानुसार तातडीने मदत देण्यात यावी, गून्हा दाखल झालेल्यांना अटक करण्यात यावी, मुलीच्या आई वडील यांच्यावर दबाव टाकणारेंचा शोध घेण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या निषेध प्रसंगी समाजाचे अध्यक्ष मोहन बागूल सचिव विजय बागूल, संतोष चौधरी, मनोहर चौधरी, दिनेश चौधरी, ललीत चौधरी, संदीप चौधरी, सोनु चौधरी, राकेश चौधरी, गोविंद चौधरी, विजय चौधरी, कमलेश चौधरी, किरण चौधरी, शामराव चौधरी, संजय चौधरी, भटू चौधरी, विजय वेताळ, प्रभाकर चौधरी, डी.एन.चौधरी, किशोर पवार, जितेंद्र चौधरी, बन्सीलाल चौधरी, दिनेशचंद्र चौधरी, नंदकिशोर चौधरी, प्रविण चौधरी, शांताराम चौधरी आदी समाज बांधव उपस्थित होते.