साक्री । नवापूरकडून साक्रीकडे येणार्या अहमदाबाद धुळे बसमध्ये वाहतूक केला जाणारा लाखो रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला. गुटखा घेवून येत असल्याची गोपनीय माहिती साक्री पोलिसांना मिळाली होती. रविवारी अहमदाबाद धुळे बस साक्रीकडे येत असतांना मिळालेल्या माहितीनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील हे पथकासह तालुक्यातील दहिवेल बस स्टॉप येथे जाऊन बसमध्ये प्रवास करण्याच्या बहाण्याने चढले असता त्याठिकाणी साड्यामध्ये बांधलेल्या गोण्यांची चौकशी केली.
संबंधित गुटखा घेऊन जाणारी व्यक्ती रमेश रूपचंद पाटील रा.पारोळा जि.जळगाव येथील असून तो गाडी क्र.एमएच 41 बीएल 4131 सोनगडहून माल घेऊन येत होता. रमेश पाटील हा शासकीय कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे. पकडलेल्या गुटख्याची किंमत अंदाजे एक लाख रूपये इतकी असल्याचे पोलीसांनी माहिती दिली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक अतुल तांबे, पोलीस उपनिरिक्षक धनराज पाटील, पोलीस का.लक्ष्मीकांत वाघ,विजय पाटील,गंगाराम सोनवणे,प्रकाश सोनवणे यांनी कारवाई केली.
महामंडळाच्या बसमधुन अवैध तस्करी
गेल्या काही महिन्यापुर्वी धुळ्याहून येणार्या एका बसमध्ये साक्री येथे पोलीसांनी दारू पकडली होती. त्याचप्रमाणे काल अहमदाबादहुन येणार्या बसमध्ये पाच ते सहा गोण्या गुटखाच्या आढळुन आल्या. एसटी बसमधुन साधे पाच कीलो वस्तुच्या पार्सललादेखील भाडे द्यावे लागते. असे असतांना 30 ते 35 कीलोच्या गोणी असुनदेखील वाहकाने संबधीत व्यक्तीला भाडे आकारले नसल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे महामंडळच्या बसमुधन अशाप्रकारची अवैध मालाची तस्करी करण्यासाठी शय मिळत असल्याचे नागरिकांमधुन बोलले जात आहे. या प्रकाराकडे एसटी महामंडळ दुलर्ष करीत असल्याने अवैध मालाची तस्करी अधीक प्रमाणात होत आहे. तर काही वाहक आर्थिक फायदा करून घेत असल्याचेही चर्चा आहे.