राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला लवकरच सुरुवात होणार आहे. यातच पहिल्या दिवशी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून म्हणजेच भाजपा कडून नवाब मलीकांविरुद्ध घोशणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपाच्या नेत्यांनी हातामध्ये अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचं बॅनर धरुन घोषणाबाजी केली. ‘दाऊदच्या दलला मंत्र्यांचा राजीनामा घ्या’, ‘महाराष्ट्राचे सरकार दाऊदचे समर्थक आहे का?’ अशी वाक्य या बॅनरवर लिहिण्यात आलेली.
‘दाऊद के दलालो को… को जूते मारो सालों को,’ ‘’ अशा घोषणा यावेळी भाजपाच्या आमदारांनी दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासहीत भाजपाने इतर अनेक भाजपाचे आमदार उपस्थित होते.