कामाचे श्रेय लाटणार्या पुढार्यांचा डाव गावकर्यांनी उधळला
चाळीसगाव । तालुक्यातील खेडगाव येथील नारळी नदीवर नव्याने मंजूर झालेल्या पुलाच आज पंचक्रोशीच्या सर्व गावकर्यांनी एकत्र येऊन भूमिपूजन केले. या कामाचे श्रेय लाटणार्या पुढार्यांचा डाव गावकर्यांनी उधळून लावला. खेडगाव येथे नारळी नदीवर जीर्ण झालेल्या पुलाच्या जागी नवीन पूल व्हावा यासाठी प्रफुल्ल साळुंखे यांनी पाठपुरावा केला. माननिय सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्याने पुलाच्या कामाला मंजुरी मिळाली. याबाबत गेली सव्वा वर्ष खेडगाव पंचक्रोशीच्या गावकर्यांना या पुलाबाबत पाठपुरावा कसा सुरू आहे. याविषयी खडा ना खडा माहिती आहे. असे असताना काही व्यक्तीनी या पुलाच बांधकामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर भूमिपूजनचा घाट घातला.
ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते विधीवत पुजा
रात्री या कामाचे उद्या भूमिपूजन होणार आहे. हे गावकर्यांना समजल्यावर गावकर्यांचा संतापाचा पारा चढला. आज सकाळी गावातील सर्व गावकरी एकत्र आले आणि गावातल्या प्रमुख आणि जेष्ठ गावकर्यांनी विधिवत पूजा सुरू केली. भूमिपूजनच्या करायला सुरवात केली. सारे गावकरी एकत्र येऊन पुलाच्या कामाचे भूमिपूजन केले. यानंतर काही पुढार्यांनी गावात येऊन या कामाचं भूमिपूजन करण्याचा प्रयत्न केला. पण हा सर्व प्रयत्न गावकर्यांनी उधळून लावला.