नविन वाहनांचे महापौरांच्या हस्ते पुजन

0

जळगाव । महापालिकेतर्फे वाहनांच्या ताफ्यात अजून दोन नविन वाहनांची भर पडली आहे. ही वाहने सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागासाठी उपलब्ध झाली आहेत.

या दोघ वाहनांचा शुभारंभ महापौर ललित कोल्हे यांच्या हस्ते पुजन करुन करण्यात आले. याप्रसंगी उपमहापौर गणेश सोनवणे, सभागृह नेते नितिन लढ्ढा, माजी महापौर सदाशिवराव ढेकळे, नगरसेवक शामकांत सोनवणे, शहर अभियंता दाभाडे, पाणी पुरवठा अभियंता डि.एस.खडके, आरोग्याधिकारी उदय पाटील, सहा.अभियंता .सुनिल भोळे, वाहन विभागाचे एस.पी.भोळे, श्री.नेहते, श्री.लासुरे, श्री.रानवडे आदी उपस्थित होते.