शिरपूर । उपजिल्हा रुग्नालयातील क्ष-किरण मशिन ऑगस्ट 2016 पासुन नादुरुस्त असल्याने बंद आहे. क्ष-किरण (एक्स-रे)ची व्यवस्था नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने नवीन यंत्र मिळावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत, राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांना भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी मंत्रालयात निवेदनाद्वारे केली. अनेकदा पत्र व्यवहार करण्यात आला असून दखल घेतली जात नसल्याचे निवेदनात सांगण्यात आले आहे.
100 खाटांचे एकमेव रुग्णालय
यंत्राला 12 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेले असून ते निर्लेखीत करण्यात यावी अशी मागणी होत आहे. या रुग्णालय 100 खाटांचे असुन जिल्हातील एकमेव मोठे रुग्णालय आहे.