नवीन पिढीला जेष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे : आमदार जगताप

0

स्लग : भैरवनाथ जेष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन साजरा

नवी सांगवी : जेष्ठांनी गत काळात मार्गदर्शन करण्याचे काम केले परंतु आता येणार्‍या पिढीला दृष्टी देण्याचे काम केल्यास त्यांना उद्भवणार्‍या समस्यांना सामोरे जाण्याचे बळ मिळेल. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळे गुरव येथे केले. श्री भैरवनाथ जेष्ठ नागरिक संस्थेच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त नटसम्राट निळुभाऊ फुले नाट्यगृहात आयोजित केलेल्या आनंद सोहळ्या दरम्यान ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, स्वीकृत सदस्य महेश जगताप, माधवी राजेंद्र राजापुरे, चंदाताई लोखंडे, अरूण पवार, संस्थेचे प्रभारी अध्यक्ष बबनराव रावडे, मल्हारराव येळवे, नागनाथ निळेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सुरूवातीला श्री भैरवनाथ जेष्ठ नागरिक संस्थेची आज सर्वसाधारण सभा पार पडली त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त आयोजित आनंद मेळ्याव्यात शैलश घावटे यांच्या ’ मन उधान वार्‍याचे ’ या संगित मैफलिचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुन्या, नव्या मराठी व हिंदी गाण्यांवर जेष्ठांचीही पाऊले थिरकली आणि सक्षागृहात गायणासह नृत्याचाही आनंद त्यांनी घेतला. त्यानंतर 11 व्या वार्षिक अहवाल प्रकाशन करून वयाची पंच्याहत्तरी पार केलेल्या जेष्ठांना आमदार जगताप यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

आमदार जगताप म्हणाले, सत्कार प्रेरणा देण्याचे काम करते आणि प्रेरणा इतिहास घडविते. इतिहास घडविणार्‍या व्यक्तिंचा आज आपण गौरव केला आहे. त्याच जेष्ठांकडून आता इतिहास घडविणारे तयार झाले पाहिजेत. संपुर्ण आयुष्य आपण कुटुंब व समाजासाठी खर्च केले आणि भविष्यातही आपणात तीच उर्मी दिसून येतेय. कुटूंबाची जबाबदारीतून आपण मुक्त होत असताना समाजासाठी काम करण्यासाठी बाहेर पडत आहात हे कौतुकास्पद आहे.

संस्थेचे सचिव जालंदर दाते यांनी अहवाल वाचन केले. नामदेव तळपे यांनी सुत्रसंचलन केले. मधुकर नवले यांनी आभार मानले. तर कार्याध्यक्ष मल्हारराव येळवे, कोषाध्यक्ष नागनाथ निळेकर, प्रकाश बंडेवार यांच्यासह संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी कार्यक्रम यशस्वी केला.