नवीन वसाहतीत आकडे टाकून सर्रास वीज चोरी

0

नंदुरबार। शहरात नवीन वसाहतीत वीज कंपनीच्या विद्युत पोलवर आकडे टाकून सर्रास वीज चोरी केली जात आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकार्‍यांचे साफ दुर्लक्ष होत आहे. दर महिन्याला प्रामाणिकपणे वीजबिल भरणार्‍या ग्राहकांनी अशा वीज चोरीच्या प्रकारामुळे वितरण कंपनीवर नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या पाणी पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विद्युत तारांवरील आकडा जर एखाद्याचा अंगावर पडला तर मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया शुक्रवारी वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची यांची बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेत वीज चोरीवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले होते.विदयुत तारांवर आकडी टाकून वीज वीज चोरी करणार्‍यांचा शोध घेऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.