नवीन वसाहतीत नागरिक विविध समस्यांनी त्रस्त

0

शहादा । शहरातील नवीन वसाहतीत नागरिक विविध समस्यांनी त्रस्त आहेत. त्यात भरीसभर म्हणून रात्रीचे पथदिवे नेहमीच बंद स्वरूप असतात पथदिवे शो-पीस म्हणून बनून राहिले आहेत. यात चोरट्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात फावले. अंधाराचा फायदा घेऊन घरफोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पाण्याची पातळी खालावल्याने बोअरवेल आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना प्यायला पाणी नाही. वेळोवेळी नागरिकांनी पाठपुरावा करून देखील परिस्थिती जैसे थे च आहे. शहरातील स्वामी समर्थनगर, शारदा नगर, मंगलमुर्ती गनर इ. वसाहतीत अजुनही नगरपालिकेच्या पाण्याचा एक थेंब देखील पोहचला नाही. चार पाच वर्षात शोष खड्डे भरतात मात्र ड्रेनेज वायर जाणार तर कुठे शहरात भुयारी गटारी होणे ही आवश्यक बाब आहे. सत्ताधारी व विरोधक गट मिळन ही वाढत असलेली मोठी समस्या मार्गी लावतील ही अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. नाईलाजास्तव नवीन वसाहतीतील लोक गटारी नसल्याने सांडपाणी हे ओपन स्पेसमध्ये सोडून देतात त्याने पाणी साचून घाणीचे साम्राज्य तयार होत आहे.