नवीन समर्थ विद्यालयातील विद्यार्थ्यांना टी शर्ट वाटप

0

ज्येष्ठ ÷उद्योजक विलासराव काळोखे यांची राबविला उपक्रम

तळेगाव : क्रीडा क्षेत्रात विशेष नैपुण्य प्राप्त करणार्‍या येथील नवीन समर्थ विद्यालयातील 50 विद्यार्थ्यांना टी शर्ट व क्रीडा शिक्षकांना स्पोर्टस् सूट तालुक्यातील ज्येष्ठ उद्योजक विलासराव काळोखे यांनी दिले. हा कार्यक्रम नवीन समर्थ विद्यालयात नुकताच रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीच्या वतीने संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, म्हणून संस्थापक विलासराव काळोखे यांनी हा उपक्रम राबविला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी रवी धोत्रे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना टी शर्ट वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे अध्यक्ष शशिकांत हळदे, संस्थापक विलासराव काळोखे, नितीन शहा, मनोज ढमाले, दिलीपभाई पारेख, दादासाहेब उर्‍हे, बाळासाहेब रिकामे, संजय मेहता, राजेश गाडे, नंदकुमार शेलार, सुरेश शेंडे, भगवान शिंदे, रेश्मा फडतरे, शाईन शेख, सुनील महाजन, शरयू देवळे, बाळासाहेब भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते.