पिंपरी-चिंचवड : मराठवाडा जनविकास संघ व ओम साई फाउंडेशन यांच्या वतीने नवी सांगवी पोलीस ठाण्यास दहा बॅरिगेट व दहा घड्याळे भेट देण्यात आली. संघाचे अध्यक्ष अरुण पवार व फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते या वस्तु देण्यात आल्या. यावेळी सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, सूर्यकांत कुरुरकर, तौफिक सय्यद, निलेश मातणे, विजय सोनवणे, वामन भरगंडे, अण्णा जोगदंड, संतोष अंधारे, व्यंकट बिराजदार भैरोजी मंडले, दीपक जाधव, राजेश गाडेकर, शिवाजी सुतार, प्रकाश बंडेवार, गोपाल माळेकर, येळवे काका व इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.
अरुण पवार म्हणाले की, पोलीस हे आपल्यासाठी रात्रंदिवस सेवेत असतात. त्यांच्यामुळे समाजात शांतता नांदत असते. सामान्य नागरिक म्हणून आपणही या समाजकार्यात सहभागी व्हायला हवे. खारीचा वाटा म्हणून पोलिसांना वेळोवेळी आपण मदत करायला हवी. सूत्रसंचालन अदिती निकम यांनी केले. आभार माधव मनोरे यांनी व्यक्त केले.