मुंबई :- अर्थसंकल्प पुढच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडला. नव्या जुमलेबाजीने भरलेला अर्थसंकल्प आहे. मूठभर धनदांडग्या लोकांसाठीच चांगला अर्थसंकल्प. नोकरदार, शेतकरी यामध्ये वाऱ्यावर दिसताहेत. रब्बी हंगामापासून दीडपट हमीभाव वाढवून दिली ही शुद्ध फसवणूक आहे.
बजेटमध्ये फक्त 10 टक्के गुंतवणूक शेतीक्षेत्रासाठी घोषित केलीय. सरकारच्या दृष्टीने शेतीला प्राधान्य नाही. जीडीपी वाढला असे म्हणताहेत. मग व्यापार का नाही वाढला. न केलेल्या प्रगतीचा देखावा केलाय. 20 लाख नवीन शाळांची घोषणा पण त्या नव्या शाळा कुणाच्या? आहे त्या शाळा सरकार बंद करताहेत. एकलव्याचा अंगठा मागणारे हे द्रोणाचार्य सरकार आहे. एकूणच हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. गरीब, वंचित कुठल्याही घटकांना यामुळे कुठलाही आधार मिळणार नाही. याचाच परिणाम म्हणजे नागरिक मतपेटीतून राग दाखवून देत आहे. लोकांमध्ये परिवर्तन होतेय. अजमेर आणि अलवा लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार होते. त्या ठिकाणी नागरिकांनी काँग्रेसला निवडून दिलेय. ही परिवर्तनाची नांदी आहे.
– राधाकृष्ण विखे पाटील
विरोधी पक्ष नेते विधानसभा