जळगाव । प्रत्येक व्यक्तिने आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या हेतूने कार्य केले पाहिजे. समाजाच्या सानिध्यात जीवन व्यतीत केल्याशिवाय विकास शक्य नाही. समाजाच्या बळावर मोठे झालेल्यांनी समाज विकासासाठी प्रयत्न करायला हवे. नव्या पिढीने शिक्षणाच्या माध्यमातून समाजहीत साधायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार रमेश झंवर यांनी केले. माहेश्वरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार रविवारी 27 रोजी महेश प्रगती मंगल कार्यालयात करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. माहेश्वरी समाज प्रज्ञा गौरव समारंभ 2017 चे ते प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. माहेश्वरी समाज हा सुरुवातीपासून व्यापार करत आला आहे. मात्र अलीकडच्या कालखंडात समाजबांधवांचा कल हा व्यापाराकडे न दिसत नोकरीकडे अधिक दिसून येत आहे. मात्र नोकरी मागे न धावता नोकरी देणारे व्हा असे आवाहनही त्यांनी यावेळी समाजबांधवांना केले. व्यवसायातून समाज उभारणीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. याचा सर्व समाजबांधवांनी विचार करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
रमेश झंवर यांचा सन्मान
रमेश झंवर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपला कार्याचा ठसा उमटविलेला आहे. सुरुवातीला त्यांनी मराठा या दैनिकात उपसंपादक म्हणून कार्य केलेले आहे. त्यानंतर त्यांनी लोकसत्ता या दैनिकात दिर्घकाळ सहसंपादक म्हणून कामकाज पाहिलेले आहे. त्यांना लाईफ टाईम अॅचिव्हमेंट अवार्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. 13 ऑगस्ट 2017 रोजी आचार्य अत्रे स्मारक समितीच्या वतीने त्यांना पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या आजवरची कामगिरी लक्षात घेता माहेश्वरी समाजातर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.
175 गुणवंतांचा सत्कार
माहेश्वरी समाजातर्फे यावेळी झालेल्या समारंभात जिल्हाभरातील समाजातील विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यात सर्व क्षेत्रात यश संपादन केलेल्यांचा सन्मान करण्यात आला. गेल्या काही दिवसापासून समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना नावे पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. तसेच ज्यांनी या आगोदर नाव नोंदविले नव्हते त्यांनी देखील सत्कारप्रसंगी नोंदणी केली. त्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. समाजातील 175 गुणवंतांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांसहीत त्यांच्या पालकांनीही यावेळी मनोगत व्यक्त करुन समाजबांधवांचे ऋण व्यक्त केले.
यांची होती उपस्थिती
प्रज्ञा गौरव समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर नितीन लढ्ढा, राजु माहेश्वरी, उमेश मुंदडा, सतिष चरखा, विलास कारवा, राजेश बिर्ला, जयप्रकाश मुंदडा, संजय चांडक, प्रदीप मनियार, शैलेश काबरा, मंगेशलाल जाखेटे, विजय झंवर, मनिष झंवर, बालकृष्ण गेंडे, अशोक बंग, केदार मुंदडा यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.मयूर जाखेटे, धनश्री कलंत्री, अमृता नवाल यांनी केले. प्रास्ताविक प्रा.बी.जे.लाठी यांनी केले.