नशिराबादच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करणारा शिक्षक कोठडीत

0

नशिराबाद:- स्कॉलरशीप परीक्षेत नापास करेल, अशी धमकी देत खाजगी क्लासमध्ये शिकवणीसाठी येत असलेल्या 14 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर खाजगी क्लासच्या शिक्षकानेच अत्याचार केल्याने अल्पवयीन तरुणी दिड महिन्यांची गरोदर राहिल्याची संतापजनक घटना शहरात घडली होती. या प्रकरणी खाजगी क्लासचा शिक्षक तुषार शांताराम माळी (स्वतंत्र चौक, विष्णू मंदिरासमोर, नशिराबाद) यास गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्यास 23 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी शिक्षकाने डिसेंबर 2017 ते 27 फेबु्रवारी 2018 दरम्यान वेळोवेळी अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास सहाय्यक निरीक्षक आर.टी.धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक खरात करीत आहेत.