नशिराबादला तरुणाला मारहाण : चौकडीविरोधात गुन्हा

जळगाव : चौघा तरुणांनी केलेल्या मारहाणीत नशिराबाद गावातील तरुण जखमी झाला शिवाय त्याचे नाकही फ्रॅक्चर झाले. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

कारण नसताना केली मारहाण
सैय्यद हर्शद अली शेख (18, ताजनगर, डीपीजवळ, नशिराबाद) हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून शनिवार, 21 मे रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास शहरातील परकोट मोहल्ला येथे सैय्यद हर्शद अली शेख हा उभा होता. त्यावेळी काहीही एक कारण नसतांना त्याच्या गल्ली राहणारे नाजीम रहीम शेख (21), रहिम शेख फरीद (35), शेर अली सैय्यद अली (28) आणि अरबाज अली सैय्यद अली (24, सर्व रा.परकोट मोहल्ला) यांनी येवून बेदम मारहाण केली. यातील एकाने सैय्यद हर्षद अली शेख याच्या नाकावर लोखंडी वस्तू मारल्याने नाक फ्रॅक्चर केले. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी सोमवार, 23 मे रोजी रात्री साडे अकरावाजता संशयीत आरोपी नाजीम रहीम शेख, रहिम शेख फरीद, शेर अली सैय्यद अली आणि अरबाज अली सैय्यद अली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास हवालदार युनूस शेख करीत आहे.