भुसावळ- जळगाव-भादलीच्या दरम्यान असलेल्या नशिराबाद येथून भादलीकडे जाणारे रेल्वे गेट (क्र. 152) 13 आणि 14 डिसेंबर रोजी वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. तसेच जलंब-खामगाव या मार्गावरील गिट्टी ब्लास्ट मशीनचे काम सुरू करण्यात आल्याने 11 ते 24 डिसेंबर या काळात हे काम चालणार असल्याने जलंब -खामगाव दरम्यान चालणारी सकाळी 9 वाजता सुटणारी आणि खामगाव येथून सकाळी 10.50 वाजता सुटणारी रेल्वे गाडी (71105) रद्द करण्यात आली आहे.