पुणे । पहिल्यांदाच एफटीआयआयमध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) च्या विद्यार्थ्यांसाठी फिल्म अॅप्रसिएशन हा कोर्स शिवण्यात येत आहे. गुरुवारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी एफटीआयला भेट दिली. त्यांनी एनएसडीच्या विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून त्यांनी फिल्म अॅप्रसिएशन या विषयातील महत्वाच्या बाबी समजवून सांगितल्या. त्याचबरोबर चित्रपटसृष्टीमध्ये काम करीत असताना आलेले अनुभव आणि उत्कृष्ठ अभिनेता कसा असावा याचे धडे देखिल त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.