नहीतर्फे शहरातून जाणारा पाळधी बायपासचा पर्याय

0

जळगाव। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समांतर रस्त्यांच्या प्रश्नाला चालना मिळतांना दिसत आहे. जळगाव फर्स्टने समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु ठेवला आहे. जवळपास 119 दिवसांपासून दररोज केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी व परिवहन मंत्रालय यांना ट्विटरवरून या प्रश्नाची सोडवणूकीसाठी आठवण दिली जाते. आज नाही चे प्रोजेक्ट डायरेक्टर अरविंद काळे व श्री गंडी हे शहरात आले असता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या निर्देशानुसार जळगाव फर्स्टचे डॉ राधेश्याम चौधरी यांनी त्यांची भेट घेतली.

नहीच्या प्रकल्पसंचालकांशी चर्चा
6 जून रोजी सदर समांतर रस्त्यांच्या विकासांसाठी 444 कोटींचा डीपीआर तयार करून प्रकल्प संचालक अरविंद काळे यांनी नागपूर येथील नहीच्या विभागीय कार्यालयाला शिफारस करून सदर केला आहे.एल. एन. मालवीय सुपर व्हिजन कन्सल्टन्सी यांनी हा फिजीबिलीटी व डीपीआर रिपोर्ट तयार केला आहे. जवळपास 15.408 किमीचा हा जळगाव शहरातून जाणारा पाळधी बायपासपर्यंतचा हा रोड विकसित करण्यात येणार आहे.

साईड पट्ट्यांचे डांबरीकरण करा
अजिंठा चौक ,इच्चादेवी चौक येथील सिग्नल यंत्रणा हि बर्‍याचदा कार्यरत नसते अशी तक्रार डॉ चौधरी यांनी केली. त्यावर दुरुस्तीची प्रक्रिया ही अजून अपूर्ण आहे व पुन्हा शहरातील महामार्गावर साईड पट्ट्या लेव्हल करून त्यांची दबाई करण्यात येईल असे श्री काळे यांनी सांगितले. श्री. निंबाळकर यांनी चौकातील साईड पट्ट्यांचे डांबरीकरण करून ,मध्यभागी व कोपर्‍यावर पांढरे पट्टे टाकून अपघात कमी करण्यास मदत होईल असे सांगत तसे निर्देश दिले .

प्रश्‍न प्रलंबित
डॉ राधेश्याम चौधरी यांनी म्हटले आहे की, 5 लाख शहरवासीयांचा अत्यंत जिव्हाळ्याचा, सुरक्षिततेचा हा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. शेकडो शहरातील विद्यार्थी ,कामगार ,कर्मचारी ,ज्येष्ठ नागरिक या महामार्गावरील अपघातात जायबंदी ,मृत्यू मुखी पडले आहेत याकडे लक्ष वेधले. सरकारने राजकीय दृष्टीने न बघता मानवीय ,वस्तुनिष्ठ दृष्टीने बघावे. ह्या समस्ये विषयी अनेकदा अनेक सामाजिक संघ्टनांच्यामातून हजारो लोकांचा आक्रोश व्यक्त झाला आहेच. जळगाव फर्स्टसोबत अनेक सामाजिक संस्थांनी हा प्रश्‍न लावून धरला होता.