खान्देश जनआंदोलनची तालुका प्रशासनाला मागणी
चाळीसगाव – नांदगाव तालुक्यातील तापी खोर्यातील माणिकपुंज धरणाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील आठ गावांना मिळावे अशी मागणी खांदेश जनआंदोलनच्या वतीने महामहीम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांच्या कडे निवेदनाद्वारे दिनांक 15 जानेवारी रोजी तहसिलदार चाळीसगाव यांच्या मार्फत करण्यात आली आहे.
आठ गावांना 685 हेक्टर क्षेत्रास होणार फायदा
निवेदनात म्हटल्याप्रमाणे, माणिकपुंज मध्यम प्रकल्प हा तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज गावाजवळ गिरणा नदीची उपनदी असलेल्या मन्याड नदीवर बांधण्यात येत आहे. या प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरे, करंजगाव, तांबोळे, चितेगाव, हातगाव, रोहिणी, शिंदी, ओठरे एकुण आठ गावांना 685 हेक्टर क्षेत्रास फायदा होणार आहे. माणिकपुंज मध्यमप्रकल्पावर प्रथम नांदगाव तालुक्याचा हक्क असला तरी चाळीसगाव तालुक्यातील ही आठ गावे पर्जन्य छायेतील आहेत पावसाचे प्रमाण कमी व दुष्काळी परिस्थिती असल्याने या आठ गावांना प्रकल्पातील अतिरिक्त पाणी देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर यांच्या
मानवी दृष्टीकोणातुन चाळीसगाव तालुक्यातील दुष्काळग्रस्त, पर्जन्यछायेच्या अवकृपा असलेल्या प्रदेशाला अतिरिक्त पाणी माणिकपुंज मध्यम प्रकल्पातुन देण्यात यावे या संदर्भात आपण मानवी हित, शेती, पिण्याचे पाणी, तसेच पशु पक्षांचा देखील विचार करून पाणी वाटप करावे असे न झाल्यास चाळीसगाव तालुक्यातील आठ गावातील लोकांसोबत जन आंदोलन मार्फत धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने करण्याचा ईशारा देण्यात आला आहे. निवेदनावर प्रा.गौतम निकम, विजय शर्मा, आब्बा गुजर, योगेश्वर राठोड, विजय चौधरी, नाशीर भाई शेख, महेश चव्हाण यांच्या सह्या आहेत.