नांदगावला चोरट्यांचा धुडगुस ; दोन दुकाने फोडली

0

बोदवड- तालुक्यातील नांदगाव येथे चोरट्यांनी धुडगूस घालत दोन दुकाने फोडल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. प्रवीण हरी वाघ (48, नांदगाव, ता.बोदवड) व रमेश बळीराम डोंगरे यांचे किराणा दुकान फोडून चोरट्यांनी 28 हजार 890 रुपयांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी प्रवीण वाघ यांच्या फिर्यादीनुसार बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. वाघ यांच्या दुकानातून किराणा सामानासह रोख रुपये व मणी डोरल्याची पोत तसेच डोंगरे यांच्या दुकानातून एक हजार 200 रुपये लांबवण्यात आले. तपास एएसआय ब्रिजेश पाटील करीत आहेत.