भुसावळ प्रतिनिधी दि 7
नांदगाव तालुक्यातील जामदरी फाट्यावर नांदगाव एसटी डेपो आगाराच्या बसला अपघात झाला असून अपघातात शाळकरी मुले व प्रवासी गंभीर जखमी झाले असल्याचे समजते.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव एसटी डेपो ची बस क्रमांक एम एच 14 बीटी 3806 ही गिरणा डॅम कडून नांदगावकडे येत असतांना सदर बस जामदरी हॉटेल जवळ आली असता एसटी बसचे पाटे तुटल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या एसटी बस मध्ये अंदाजे 50 ते 55 प्रवासी होते. त्यामध्ये शाळकरी मुले आणि इतर प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या बस मध्ये शाळकरी मुले साकोरा व नांदगाव येत असतात. सुदैवाने बस अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नसून जखमींवर नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.